घरमहाराष्ट्रजिल्ह्यात गुटखा, गांजाची सर्रास विक्री

जिल्ह्यात गुटखा, गांजाची सर्रास विक्री

Subscribe

पोलिसांकडे कारवाईची मागणी

रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बंदी असलेल्या गुटख्यासह गांजाची सर्रास विक्री होत असल्याने या अवैध धंद्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी पोलिसांकडे केली आहे. अशी माहिती त्यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या नशिल्या पदार्थांची विक्री तेजीत आहे. याची माहिती त्या-त्या विभागातील पोलिसांना माहिती नसावी हे अतर्क्य आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांची याबाबत चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी केल्याचे बेकावडे म्हणाले. पान टपर्‍या, किराणा मालाची दुकाने, हातगाड्या आदी ठिकाणी अवैध गुटखा, गांजा यांची सर्रास विक्री केली जात असल्याची माहिती आपण स्वतः संबंधित अधिकार्‍यांना फोनवरून अथवा निवेदनाद्वारे दिली आहे. मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याचे आपण कोकण परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांना भेटून सांगितल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

गेल्या २८ जानेवारी रोजी रात्री नागोठणे येथील एका पेट्रोल पंपासमोरील गोडावूनवर धाड टाकून लाखो रुपयांचा गुटखा आणि इतर माल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर मात्र कुठेही कारवाई झालेली नाही. अवैध गुटखा, गांजा यांची गोडावून असून, तेथील कामगार राजरोसपणे दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर सर्वत्र माल पोहचविण्यासाठी होत असल्याचा आरोप बेकावडे यांनी केला. तक्रारीच्या निवेदन प्रती मुख्यमंत्र्यासह अन्य मंत्री, अधिकार्‍यांनाही पाठविण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -