घर महाराष्ट्र पुण्यात गॅस गळती होऊन स्फोट; सलमान खान थोडक्यात बचावला

पुण्यात गॅस गळती होऊन स्फोट; सलमान खान थोडक्यात बचावला

Subscribe

पुण्यात गॅसगळतीमुळे मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमध्ये सुदैवाने सलमान खान थोडक्यात बचावला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी याठिकाणी गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगवीमधील बिर्याणी हाऊसमध्ये गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नसून हॉटेल मालक आणि कारागीर थोडक्यात बचावले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाडण्याच्या सुमारास घडली असून सलमान अमजद खान यांच्या मालकीचे हे बिर्याणी हाऊस असून सलमान थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

पुण्यात सांगवी परिसरातील माकन चौकात बिर्याणी हाऊस आहे. या हाऊसमध्ये अचानक गॅस गळती होण्यास सुरुवात झाली. सलमान खान यांच्या मालकीचे हे बिर्याणी हाऊस आहे. आज बुधवार असल्याने त्यांना बिर्याणी बनवण्याची मोठी ऑर्डर होती. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिर्याणी हाऊस मालक आणि कारागीर हे बिर्याणी बनवत होते. काही वेळानंतर अचानक गॅस गळती झाली. गॅसचा वास आल्याने त्यांनी त्या हाऊसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आग लागणार हे समजताच सलमान खान आणि कारागीर बिर्याणी हाऊसच्या बाहेर पडले. हे दोघेही बाहेर पडताच हाऊसला काही क्षणातच हॉटेलला भीषण आग लागली. या घटनेमध्ये हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याचे हॉटलेच्या नुकसानावरून लक्ष्यात येत आहे. हॉटले कारागीर आणि शेजारील व्यक्तींनी पाणी टाकून आग विझवली. दरम्यान या घटनेचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.


- Advertisement -

वाचा – गॅस गळतीमुळे स्फोट; एकाच कुटुंबातील ५ जण जखमी

वाचा – सायन – पनवेल महामार्गावर गॅस गळती


- Advertisement -

 

- Advertisment -