गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

गायक सिद्धूच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर सलमान खानची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्यात आली.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Panjab Singer Suddhu Musewala) याची गोळ्या घालून हत्या (murder) करण्यात आली. सिद्धूच्या हत्येमुळे संपूर्ण पंजाब हादरले आहे. या हत्येप्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येच्या प्राथमिक तपासात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे (lorence Bishnoi) नाव समोर येते. मात्र त्याचवेळी बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचेही कनेक्शन असल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर आता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायक सिद्धूच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर सलमान खानची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्यात आली. एका इंग्रजी वृत्तपत्राती वृत्तानुसार, “आम्ही सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. कोणत्याही टोळी किंवा गुंडांकडून कोणतीही वाईट कृत्ये होणार नाहीत याची खात्री घेत आहोत. सलमानच्या अपार्टमेंटभोवती पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे”, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा कट गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराच यांनी रचला होता. त्यानुसार, शनिवार 29 मे रोजी सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्धूच्या हत्येमुळे पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. याआधीही अनेकदा तो चर्चेत आला होता. त्याची सर्वात जास्त चर्चा तेव्हा झाली होती जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगातूनच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचं कारण होतं सलमान खानचं काळविट शिकार प्रकरण. कारण गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळेच त्याने सलमान खानला काळविट शिकार प्रकरणावरुन थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याशिवाय, सलमान खानला जीवे मारण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीने प्लानिंग केले होते. ‘रेडी’ सिनेमाच्या शूटिंगवेळी लॉरेन्सने सलमान खानवर हल्ला करण्याचं प्लानिंग केलं होतं. पण त्यावेळी लॉरेन्स बिश्नोईला त्याच्या आवडीचे शस्त्र मिळाले नव्हते. त्यामुळे हत्येचं प्लानिंग पूर्ण होऊ शकले नव्हते.


हेही वाचा – LPG Cylinder Price: आजपासून सिलिंडरच्या दरात घसरण, नवे दर काय?