घरमहाराष्ट्रसलुन, ब्युटी पार्लर अत्यावश्यक सेवेत घ्या, शिष्टमंडळाला आरोग्यमंत्र्यानीही दिले उत्तर

सलुन, ब्युटी पार्लर अत्यावश्यक सेवेत घ्या, शिष्टमंडळाला आरोग्यमंत्र्यानीही दिले उत्तर

Subscribe

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिक, दुकानदार आणि इतर असंघटीत कामगारांना बसत आहे. याचदरम्यान सलुन आणि ब्युटी पार्लर मालकांनाही या लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. सलुन, ब्युटी पार्लरला अत्यावश्यक सेवेत घ्या, या मागणीसाठी राज्यातील सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

यावेळी सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने, प्रत्येक धार्मिक विधीमध्ये, दशक्रिया विधीमध्ये, ऑपरेशनच्याआधी ,आजारी रुग्ण, लहान मुलं, तरुण, वृद्ध या सर्वांसाठी सलुन, पार्लर किती महत्त्वाचे आहोत तसेच हा व्यवसाय कशाप्रकारे अत्यावश्यक सेवेमध्ये येऊ शकतो हे असोसिएशनच्या शिष्टमंडळाने राजेश टोपे यांनी सांगितले. त्या अनुषंगाने राज्यातील सलुन, ब्युटी पार्लर अत्यावश्यक सेवेत घ्या, तसेच त्यांनी लॉकडाऊनदरम्यान व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी ही मागणी करण्यात आली.

- Advertisement -

तसेच कोरोना काळात वैद्यकीय मदतीसाठी नाभिक समाजाच्या जागेची गरज लागल्यास सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन असोसिएशन तर्फे दिले गेले. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस सलुन ब्युटी पार्लर व्यवसायिकांना सरकारच्या नियमानुसार प्राधान्य क्रमाने देण्यात यावी आणि आणि सरकारला जर आर्थिक पॅकेज देणे जमत नसेल तर मग सलून आणि ब्युटी पार्लरची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी यावरसुद्धा सविस्तर चर्चा केली गेली.

या अनेक मागण्यासंदर्भातील विनंती अर्ज सलुन आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाकडे सादर केला आहे. यावर शिष्टमंडळाला आरोग्यमंत्र्यानी “मी स्वतः जातीने लक्ष घालून सलून व्यवसाय अत्यावश्यक सेवेत कशाप्रकारे येऊ शकतो यावरती कार्यवाही करेन”असा शब्द दिला.

- Advertisement -

राज्यातील सलुन ब्युटी पार्लर असोसिएशन समन्वयक बंधू चव्हाण यांच्या विशेष सहकार्याने राज्यातील महत्वाचा सलुन आणि पार्लर मालकांनी राजेश टोपेंची भेट विविध अडचणी मांडण्यात आल्या. यावेळी सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी आणि सल्लागार उदयजी टक्के, सेक्रेटरी किसनराव कोराळे , कार्याध्यक्ष निलेश रणदिवे , उपाध्यक्ष तुषारजी चव्हाण, दहिसर शाखाध्यक्ष सचिन टक्के, मुलुंड सचिव संदीप चव्हाण आणि ठाणे सचिव मंदार राऊत हे उपस्थित होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -