समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर

आघाडी सत्तेतून पायउतार होण्याआधी हा पक्ष आघाडीसोबत होता.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेत समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. समाजवादी पक्षाचे विधानसभेत दोन सदस्य आहेत. आघाडी सत्तेतून पायउतार होण्याआधी हा पक्ष आघाडीसोबत होता. (Samajwadi Party out of from Mahavikas aghadi)

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी पहिल्या दिवशी अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख हे तटस्थ राहिले.

हेही वाचा – नार्वेकर विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर किती दिवस बसणार? सुनील प्रभूंचा सवाल

आपण यावेळी तटस्थ भूमिका घेतली याचा खुलासा आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावेळी  बोलताना केला. आघाडी सरकार सत्तेवरुन पायउतार होत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर केले. मुस्लिम नावे बदलून काय होणार आहे, अशी नावे बदलून तुम्ही काय संदेश देता? त्यापेक्षा त्या शहरांचा विकास करा. नवी शहरे वसवून त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, असा सल्ला आझमी यांनी दिला.

हेही वाचा – शहरांची नावे बदलून काय संदेश देणार आहात?, अबू आझमींची टीका

आझमी यांच्या या मुद्द्यावरून सभागृहात थोडा गोंधळ उडाला. शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी त्याला आक्षेप घेतला. औरंगजेब हा अतिरेकी होता, असे जाधव यांनी सांगत आघाडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.