घरमहाराष्ट्रबाळासाहेबांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी.नड्डा कोणत्या हवेत आहेत?, सामनातून रोखठोक सवाल

बाळासाहेबांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी.नड्डा कोणत्या हवेत आहेत?, सामनातून रोखठोक सवाल

Subscribe

ज्या बाळासाहेबांमुळे मोदी महाराष्ट्रात तरले त्यांच्याच शिवसेनेला संपवायला निघालेलेल जे.पी.नड्डा कोणत्या हवेत आहेत, असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

शिवसेनेसह देशातील इतर प्रादेशिक पक्ष संपणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याची दखल देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावरून शिवसेनेनेही त्यांना एका उपकाराची आठवण करून दिली आहे. ज्या बाळासाहेबांमुळे भाजप महाराष्ट्रात तरले त्यांच्याच शिवसेनेला संपवायला निघालेलेल जे.पी.नड्डा कोणत्या हवेत आहेत, असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

हेही वाचा – सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज काय होणार? संपूर्ण राज्याचं लक्ष

- Advertisement -

शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. आज संबंधात दुरावा नक्की आहे, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात. दुसरे म्हणजे संपूर्ण जग श्री. मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्त्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते. गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींनी राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा राजधर्म वगैरे बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका, असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेलेल जे.पी.नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? नड्डा हे हुकुमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे. भारत हा सर्वांत मोठा लोकशाहीप्रधार देश आहे व श्री मोदी प्रधानजी आहेत. ते लोकशाही मार्गाने निवडून आले. लोकांचा पाठिंबा मिळाला तर त्यांनी पुन्हा निवडून यावे, पण आम्हीच निवडून येऊ व आमच्यासमोर विरोधी पक्षच शिल्लक ठेवणार नाही, ही भाषा लोकशाहीस मारक आहे. देशात सत्तेवर कोणी राहायचे हे लोकांनी ठरवायचे.” असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा – शिवसैनिकांनो पाय रोवून उभे राहा; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन

- Advertisement -

अग्रलेखात आणखी काय म्हटलंय?

  • प.बंगाल, केरळ, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा राज्यांत प्रादेशिक पक्ष मजूबत स्थितीत आहेत. शेवटी ही प्रादेशिक अस्मिता आहे व ती राहणारच. सगळेच काही तुमच्या मागे फरफटत जाणार नाहीत.
  • तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील, पण बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा आकाशाला गवसणी घालेल. तुमच्या धमक्यांना भीक घालणारी शिवसेना नाही. संपवू वगैरे भषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्यांना करा. नड्डा यांची भाषा लोकशाहीसाठी मारक आहे, पण ते ज्यांच्या सावलीत वावरत आहे ते पाहता त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी?
  • महाराष्ट्रापासून देशात सर्वत्र काँग्रेससह अनेक पक्ष फोडूनच भाजपची वाढ झाली. म्हणजे भाजपचे डोके असले तरी हात, पाय, नाक, कान वगैरे सगळे दुसऱ्यांचे आहे व शिवणकाम करून ते शरीर जुळवले आहे. तुमच्याच वंशवेलीचा पत्ता नाही आणि तुम्ही देशातील इतर पक्षआंना संपवायची भाषा करताय. कोणी राहायचे व कोणी जायचे हे लोकांना ठरवू द्या, पण लोकभावनांचा तरी कोठे आदर होतोय?
  • नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मराठीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की भाजपने खोटा खोटा का होईना गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही.
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -