Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र 'अजितदादा पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी भाजपची कोण-कोण लोकं होती?'

‘अजितदादा पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी भाजपची कोण-कोण लोकं होती?’

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक वाग्युद्ध रंगलं आहे. सरकार पाडण्यावरून सुरू झालेला वाद आता पहाटेच्या शपथविधी पर्यंत येऊन ठेपला आहे.  या वादात आता शिवसेनेने एन्ट्री घेतली असून आजच्या ‘सामना’तील अग्रलेखामधून कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांसाठी बॅटिंग केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना केला. यावरून शिवसेनेने जोरदार निशाणा साधला आहे. अजितदादा पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी भाजपची कोण-कोण लोकं होती? असा सवाल करत टोला लगावला आहे.

- Advertisement -

“अजित पवारांनी ५४ आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी ‘आ बैल मुझे मार’ असेच केले आहे. अजित दादा मोठया पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’ चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा . एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता. त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला खरा, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला,” अशा शब्दांत शिवसेनेने निशाणा साधला आहे.

पाटलांचा पत्रचोरीचा स्फोट म्हणजे पोरखेळ

- Advertisement -

“चंद्रकांत पाटील यांनी आता असा स्फोट केला आहे की, पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांनी जे ५४ आमदारांच्या सहीचे पत्र भाजप नेत्यांच्या माध्यमातून राज्यपालांना सादर केले तो एक मोठा घोटाळा आहे. हे पत्र अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरले. हे असे पत्र चोरणे नैतिक की अनैतिक, असा प्रश्न पाटलांनी विचारला आहे. पाटलांचा पत्रचोरीचा स्फोट म्हणजे पोरखेळ आहे,” अशी टीका देखील शिवसेनेने केली आहे.

- Advertisement -