Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र एका वृत्तपत्राचं मत हे महाराष्ट्राचं मत होऊ शकत नाही; अजित पवारांचं चोख...

एका वृत्तपत्राचं मत हे महाराष्ट्राचं मत होऊ शकत नाही; अजित पवारांचं चोख प्रत्युत्तर

Subscribe

एका वृत्तपत्राचं मत हे संपूर्ण महाराष्ट्राचं मत होऊ शकत नाही, असंही अजित पवार म्हणाले

महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा असतानाच, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत नेहमीच काहीना काही वक्तव्य करताना दिसतात. आता ठाकरे गटाचे मुखपत्र सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हणत खळबळ उडवून दिली. काँग्रेस पक्षातील एक गट भाजपमध्ये जाण्यासाठी बॅग भरुन तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता यावर अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.( Samana newspapers opinion cannot be Maharashtras opinion Ajit Pawars reply to Sanjay Raut )

काय म्हणाले अजित पवार ?

राष्ट्रवादीचा एक गट भाजपमध्ये जाण्यासाठी बॅग भरुन तयार आहे, असं संजय राऊतांनी सामना अग्रलेखात म्हटलं होतं. याबाबत आता अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यावर शरद पवार यांनी परवा काय सांगितले ते ऐकलं ना. आमच्या राष्ट्रीय नेत्याने सांगितल्यानंतरही दुसरा कोणी काही बोलत असेल तर त्याला महत्त्व देण्याचं काही कारण आहे, असं मला वाटत नाही, असं अजित पवार म्हणाले. तसचं, एका वृत्तपत्राचं मत हे संपूर्ण महाराष्ट्राचं मत होऊ शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: स्ट्रॉबेरी बघून शेती होते का?; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला )

महत्त्वाचे मुद्दे

  • प्रत्येक सरकार धोका नाही, असंचं सांगत
  • परंतु अधिकाऱ्यांकडून मिळत असणारी माहिती वेगळी आहे.
  • निवडणुकीचं वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा राज्यकर्त्यांना प्रयत्न कर्नाटकात सुरु आहे.
  • फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणाला विजय मिळेल? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारण्यात आला. आता काही सांगता येत नाही. आपण कोणीही ज्योतिषी नाही. प्रत्येकजण आपापल्या परिने सांगतो. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचं वातावरण चांगलंय असं मीडिायत सातत्याने वाचायला मिळत होतं. नंतर बजरंग दलाबद्दल भूमिका घेतल्यानंतर मग तिथे एकदम भाजपच्या मोठ्या नेत्यांना बजरंगाची मूर्ती देण्याची परंपरा सुरु झाली. भावनिक माध्यमातून निवडणुकीचं वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

- Advertisement -

 

- Advertisment -