घरताज्या घडामोडीगौतमीच्या 'पाटील' आडनावाच्या वादात शाहीर संभाजी भगत व सुषमा अंधारे यांची उडी;...

गौतमीच्या ‘पाटील’ आडनावाच्या वादात शाहीर संभाजी भगत व सुषमा अंधारे यांची उडी; फेसबुक पोस्ट करत म्हणाले…

Subscribe

गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्यातील सर्वांच्याच मनावर गौतमी पाटील (Gautami Patil) अधिराज्य गाजवत आहे. एकीकडे डान्सवरून गौतमीचे कौतुक केले जाते तर, दुसरीकडे गौतमी विरोधात तक्रारही दाखल केल्या जात आहेत. नुकताच गौतमीच्या आडनाववरून नवा वाद सुरू झाला आहे.

गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. राज्यातील सर्वांच्याच मनावर गौतमी पाटील (Gautami Patil) अधिराज्य गाजवत आहे. एकीकडे डान्सवरून गौतमीचे कौतुक केले जाते तर, दुसरीकडे गौतमी विरोधात तक्रारही दाखल केल्या जात आहेत. नुकताच गौतमीच्या आडनाववरून नवा वाद सुरू झाला आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील अडनाव वापरु नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. (Sambhaji Bhagat and sushma andhare facebook post on gautami patil)

या पार्श्वभूमीवर शाहीर संभाजी भगत (Shahir Sambhaji Bhagat) यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शाहीर संभाजी भगत यांनी पुरुषांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गौतमी पाटील हिला पाठिंबा देणारे वक्तव्य केले आहे. शिवाय, नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरं..? असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

शाहीर संभाजी भगत यांची फेसबुक पोस्ट

नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते?? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण ….
ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे …नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये !!!

आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे!!

- Advertisement -

पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही , मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही ?? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत??

मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे , भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच ,पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्री कडे सुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात !! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्या पेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात!!बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात!!

स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच ,पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जातेय तिने सुद्धाया बाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवे !!

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट

नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली. पण आडनावात काही आहे का नाही. तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडले. आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ब्राह्मणवर्णातील आडनाव ही विद्यामय असावीत. क्षत्रिय वर्णीयांची आडनावे वीरमय, वैशांची आडनावे ही व्यापारमय असावी, तर शूद्रांची आडनावे ही निंदनीय असावीत असे गृहीतक आहे .

ढोरगवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी ही ओळ ही एका अर्थाने शूद्र स्त्रिया किंवा जनावरे यांना एकाच तराजूत तोलावे अशा आशयाची येते. शूद्र वर्णांमध्ये बहुतांश आडनावे हि पशूंच्या नावावर दिसतात जसे डुकरे, बैले,पारवे हत्तीआंबिरे, मांजरे, निळे , हिरवे .

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धा नंतर वर्णव्यवस्था तितकीशी जाणवत नाही. मात्र जात व्यवस्थेची दाहकता आजही टिकून आहे ग्रामीण भागात ती विशेषत्वाने जाणवते. त्यामुळे ग्रामीण भागातून स्वतःला आजमावू पाहणारी आणि अत्यंत उपेक्षित व पीडित वर्गातून येणारी नवी पिढी बऱ्याचदा आडनावे बदलून नागरवस्तीमध्ये स्वतःला सिद्ध करू पाहतात.

एका अर्थाने अशा पद्धतीने आडनावे बदलून लोकांना राहावे लागते; हे भारतीय समाज व्यवस्थेतील जातीव्यवस्था घट्ट करू पाहणाऱ्यांचा विजयच म्हणावा लागेल. थोडक्यात काय तर हा सगळा आटापिटा जात ओळखली गेली तर कदाचित आपली संधी डावल्ली जाईल की काय या भीतीपोटीचा. यात अजून एक वेगळ्या प्रकारची माणसं पण आहेत की जी मूळ प्रस्थापित आहेत किंवा जी सवर्ण आहेत मात्र त्यांची आडनावे त्यांना काहीशी अडचणीची वाटतात.

…आणि म्हणून आडनावांच्या सोबत ते पाटील असेही बिरूद लावतात. उदाहरणार्थ माझ्या वर्गात माझ्यासोबत शिकणारा एक मुलगा त्याचे संपूर्ण इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे आडनाव गाढवे होते. मात्र मागील दोन वर्षात त्याने त्याचे आडनाव गाढवे पाटील असे केले. किंवा एखाद्याचे आडनाव काळोखे असेल तर काळोखे पाटील करणे किंवा कोळसे असेल तर कोळसे पाटील करणे, आवारे असेल तर आवारे पाटील करणे…

गौतमी पाटील प्रकरणात मात्र अजूनच वेगळी गंमत आहे. तिला असलेले पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे. इथे ही बाब उल्लेखनीय आहे की, नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवार ला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही.

एखाद्या मुलीला, माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दुषित आहे, ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जातय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे. आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटबळाच्या जोरावर अशी दडपशाही करता..


हेही वाचा – वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस खासदार धानोरकरांची प्रकृती खालावली; Air Ambulance ने

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -