घरमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे सुराज्य निर्माण करू; छत्रपती संभाजी राजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे सुराज्य निर्माण करू; छत्रपती संभाजी राजे भोसले

Subscribe

नवी मुंबईः महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचप्रमाणे इतर बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा, संत वारकरी परंपरेचा वारसा आहे. परंतु आता राज्यात सुरू असणारे राजकारण पाहता नीतिमत्ता राहिलेली दिसत नाही. सर्वसामान्य जनताही आता कंटाळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सुरू असणारे राजकारण हे चुकीचे आहे. त्यासाठी स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आगामी कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे सुराज्य निर्माण करू, अशी गर्जना छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी नवी मुंबईत केली.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची पहिली जाहीर सभा रविवारी कोपरखैरणे येथे पार पडली. या कार्यक्रमाला उपस्थित शिवप्रेमीं नागरिकांना छत्रपती संभाजीराजे यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या निमित्ताने बाईक रॅली काढण्यात आली होती तर सभेच्या गर्दीतून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

- Advertisement -

आपण जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलो तरी आपल्याला मिळणारा मान आणि सन्मान हा महाराजांच्यामुळेच मिळत आहे. महाराष्ट्राची जनता आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना कंटाळली असून परिवर्तनाची नांदी सुरू होणार असल्याचे संकेत दिले. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम करण्यात येणार आहे. सन 2024 च्या निवडणुका स्वराज्य संघटना लढवणार असल्याची घोषणा देखील छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केली.

राज्यात बळीराजा हा कर्जबाजारी झाला आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना कृषी मंत्र्यांना त्याचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्याची झालेली दुरावस्था पाहतात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे कोपरखैरणे येथे व्हाईट हाऊस आहे. अमेरिकेत एकच व्हाईट हाऊस असताना इथे व्हाईट हाऊस निर्माण करायची गरज काय?. पांढरा रंगवलं म्हणून व्हाईट हाऊस होत नाही. लोकं ठरवतील तेव्हा वाईट हाऊस झाले पाहिजे. नवी मुंबईतील व्हाईट हाऊसमधून हुकूमशाही कारभार चालत असल्याचे टीका छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी गणेश नाईक यांच्यावर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -