मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युतीची घोषणा

राज्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषमा शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई यांनी केली. सर्वसामन्य जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेतल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

Sabhaji Briged

राज्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषमा शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई यांनी केली. सर्वसामन्य जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेतल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. तसेच, संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केल्याची माहितीही देसाई यांनी दिली. तसेच, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र येऊन पुढील वाटचाल करण्यासाठी संमन्वय समिती नेमावी, अशी सूचना संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली होती. त्यांची ही सूचना मान्य केल्याचेही यावेळी देसाई यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना एकत्र येण गरजेच असल्याचे संभाजी बिग्रेडचे प्रमुख प्रवक्ते गंगाधन बनबरे यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड यांच्याशी युती करत असल्याचे सांगितले. तसेच, “लढावय्या सहकाऱ्यांचे स्वागत असा उल्लेख केला. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्याकडे काही नसताना सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटते”, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

“शिवप्रेमी असल्याने रक्त एकच आहे. दुहीच्या शापाला गाढून टाकू. एकत्र येत नवा इतिहास घडवू. निवडणुक डोळ्यासमोर ठेवून युती नाही असेहे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, आमचे हिंदुत्व पटल्याने आम्ही एकत्र येत आहोत. लवकरच महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घेणार आहे”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

“भाजप संघाची विचारधारा मानत नाही. असा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजप संघाला मानतं मग तसं वागत का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर बर झालं शिंदे गेले असंगाशी संग तुटला असे म्हणत त्यांनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.

“महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना राज्यात एकत्र येणार आहे. तसेच, येत्या काळात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र युतीने काम करणार आहे”, असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आकरे यांनी म्हटले.


हेही वाचा – सामना वृत्तपत्र नसून एका पक्षाचे पॅम्प्लेट, सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल