घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंभाजी ब्रिगेड, शिवसेनेत वादाची ठिणगी; 'सावरकरांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही' : जाधव

संभाजी ब्रिगेड, शिवसेनेत वादाची ठिणगी; ‘सावरकरांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही’ : जाधव

Subscribe

नाशिक : संभाजी ब्रिगेड आणि उध्दव ठाकरे शिवसेना यांच्यात युती असली तरी सावरकरांबद्दल अपशब्द कदापी सहन करणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरच दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार (दि.30) रोजी दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ही ठिणगी पडली. संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी भाषणात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झाली. त्यामुळे राजकारणात आता सर्वसामान्य चेहरे दिसतील. सावरकर यांनी डॉ आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्म स्विकारला तेव्हा विखारी भाषेत लेख लिहीला होता. त्यावर डॉ. आंबेडकरांनी तोडीस तोड उत्तर दिले होते, असे सांगत सावरकर तर आमत्या खिजगणतीत देखील नाही, अशी टिका केली. या टिकेला त्यांच्याच व्यासपीठावरुन जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आपली युती असली तरी सावरकरांना दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे. मी अंदमान येथे जाऊन ती कोठडी बघून आलो आलो आहे. तिथे त्यांना होणार्‍या यातना बघितल्या आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीही अपवाक्य खपवून घेतले जाणार नाही. आपल्याच व्यासपिठावरुन मी आज आपल्याला सांगत आहे. आपली युती झाली त्यामुळे आपले मत एक असावे असे काही नाही. एकाच व्यासपिठावर असताना तुम्ही बोलण्याचे भान ठेवा, मी देखिल ठेवेल, असे देखिल जाधवांनी यावेळी सुनावले. यावेळी राज्य कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे महासचिव सौरभ खेडेकर मुख्य प्रवक्ते गंगाधर बणबरे व सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी भास्कर जाधव यांनी सारवासारव करत संभाजी ब्रिगेड राष्ट्रपुरुषांचे विचार घेऊन पुढे जाणारी ब्रिगेड आहे. यांचे राजकीय ध्येय शिवसेनेच्या साथीने पूर्ण होवो या वर्धापणदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ऋतुजा लटके यांचा विजय म्हणजे देशातील अनागोंदी कारभारचा विजय आहे. संभाजी ब्रिगेड ताकद सेनेच्या पाठीशी आहे. सेनेने जातीपातीचे राजकारण केले नाही. छत्रपती विचार घेऊन संभाजी ब्रिगेड वाटचाल सुरू आहे. उद्धव ठाकरे सारखे साधे संयमी आणि जमीनिवर चालणारे व्यक्तिमत्त्व सेनेकडे आहे, ते काही तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्हीही सोडू नका. असे म्हणत या युतीची विशेष घोषणा यावेळी जाधवांनी केली. यावेळी उपस्थित नाशिकचे निरीक्षक डॉ संदीप कडलग,जिल्हाध्यक्ष डॉ स्वप्निल इंगळे ,महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ,जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील, उपजिल्हाप्रमुख विशाल अहिरराव, सरचिटणीस विकी गायधनी लोकसभा अध्यक्ष शरद लबडे,मंदार धिवरे,सागर पाटील,अक्षय आठवले,हरेशवर पाटील,राकेश जगताप,संकेत चराटे,चेतन पगारे,प्रथमेश पाटील व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -