लाल महालात लावणी करणाऱ्या अभिनेत्री वैष्णवी पाटीलसह ४ जणांवर गुन्हा दाखल

sambhaji brigade strong objection on lal mahal chandra song video by vaishanavi patil jitendra awhad protested by tweeting
वैष्णवी पाटीलचा माफीनामा

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात चंद्रमुखी या सिनेमातील चंद्रा या गाण्यावर लावणी नृत्यू करणारी नृत्यांगणा वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटीलसह आणखी चार जणांच्या विरोधात शिवप्रेमी संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबतची तक्रार फरासखाना रोड येथील पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली. दरम्यान लाल महालात लावणी सादर करणाऱ्या वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे.

वैष्णवी पाटील माफीनामा 

या सर्व प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. माफी मागत वैष्णवीने या व्हिडीओमध्ये म्हटले की, ‘पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागते’.

पुण्यातील (Pune) ऐतिहासिक लाल महालात (Lal mahal) लावणीचा व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक राजकीय, सामाजिक आणि कलाविश्वातील लोकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान संभाजी ब्रिगेडनेही (Sambhaji Brigade) या व्हिडीओवर आक्षेत घेत संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रार दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आक्षेप नोंदवत पुणे पोलिसांना कारवाईचे आवाहन केलेय.

लालमहालातील लावणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये मराठीतील चंद्रमुखी या सिनेमातील चंद्रा या गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसतेय. प्रसाद ओक दिग्दर्शित या गाण्यावर तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसतेय. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन नाचताना दिसतेय. पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालात लावणीचा व्हिडीओ शूट केल्याने अनेक राजकीय संघटना आक्रमक झाल्यात. कुलदीप बापट यांनी या गाण्याचे शूटिंग केले असून वैष्णवी पाटील यांनी यात लावणी केली आहे. इन्स्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी तिने चक्क लाल महालात ही लावणी केली. त्यामुळे आक्रमक संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर वैष्णवी पाटीलसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. विनापरवागी लावणी केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे.

लावणीच्या व्हिडीओला जितेंद्र आव्हाडांचा विरोध

लाल महालातील लावणीच्या या व्हिडीओ राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच नागरिकांना असे प्रकार पुन्हा करू नये असा आवाहन केलेय, यावर मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे असे होता कामा नये, कोणी केले असेल तर चित्रीकरण वापरू नका.

लाल महालातील लावणी व्हिडीओ प्रकरण नेमंक काय आहे?

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात डान्सर वैष्णवी पाटील (Vaishanavi Patil) नामक तरुणी बेभान होऊन चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा (Chandra) गाण्यावर थिरकताना दिसत आहे. (Chandramulhi)  तिच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर संभाजी ब्रिगेड संघटनेने संबंधित व्हिडीओवर तीव्र आक्षेप नोंदवला. महाराष्ट्रातील स्मृतीस्थळांवर बिभत्स पद्धतीने गाणं वाजवत नृत्य केले जाते. माझी पुणे पोलीस आयुक्तांना विनंती आहे, त्यांनी यात जातीने लक्ष घालून फरासखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती संभाजी ब्रिगेड संघटनेने केली होती. या विनंतीनंतर आता संबंधित व्हिडीओतील तरुणी आणि तिच्या दोन सहकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Bihar Storm : बिहारमध्ये वीज पडून 33 जणांनी गमावला जीव, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख