Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र संभाजीनगरमधील दंगलखोरांचा जामीन फेटाळला; रामनवमीच्या दुसऱ्या दिवशीचा हिंसाचार

संभाजीनगरमधील दंगलखोरांचा जामीन फेटाळला; रामनवमीच्या दुसऱ्या दिवशीचा हिंसाचार

Subscribe

 

मुंबईः रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी नगर येथील ओहरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आठ आरोपींचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी फेटाळून लावला. आरोपींना जामीन झाल्यास पुन्हा दंगल उसळू शकते , असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळला.

- Advertisement -

भास्कर लिंबाजी पिठोरे (वय 26 वर्षे), अजय दीनानाथ भालकर (वय 34 वर्षे), मोसीन खान मोईन खान पठाण (वय 33 वर्षे), मुजफ्फर मन्‍सूर पठाण (वय 25 वर्षे), फयाज हारुनखाँ पठाण (वय 19 वर्षे), मोसीन रशिदखाँ पठाण (वय 22 वर्षे), मु‍स्तकिन नसीरखाँ पठाण (वय 32 वर्षे) आणि खान समीर अकबर ऊर्फ एमडी समीर (वय 23 वर्षे, सर्व रा. ओहरगाव) अशी जामीन रद्द झालेल्या आरोपींची नावे आहेत.

रामनवमीच्या दंगलीनंतर अटक झालेल्या या आरोपींनी नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सरकारी पक्षाने आक्षेप घेतला. याप्रकरणातील अन्य आरोपींना अटक करायची आहे. दंगलीसाठी वापरलेली हत्यारे हस्तगत करायची आहेत. तसेच या आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा दंगल उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा सरकारी पक्षाने केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

- Advertisement -

दरम्यान, किराडपुरा भागात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी सलमान खान हारुण खान (वय 24 वर्षे, रा. गणेश कॉलनी), शेख फैजान शेख मेहराज (वय 20 वर्षे, रा. किराडपुरा) आणि शेख सर्फराज शेख शफिक (रा. रहेमानिया कॉलनी) या तीन आरोपींना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर किराडपुरा भागातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसर्‍या गटाशी वाद झाला होता. हा वाद टिपेला पोहचताच दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. अनियंत्रित झालेल्या या जमावाने पोलिसांसह इतर १५ वाहनांना लक्ष्य करून जाळपोळही केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही करावा लागला, तर पोलिसांच्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला होता.

- Advertisment -