घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरSambhajinagar riots: पोलीस, अग्निशमन दल उशिरा का आलं? इम्तियाज जलील यांचा सरकारला...

Sambhajinagar riots: पोलीस, अग्निशमन दल उशिरा का आलं? इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल

Subscribe

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात (Kiradpura) दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे. यात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून आठ ते दहा गाड्या जाळण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात (Kiradpura) दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे. यात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून आठ ते दहा गाड्या जाळण्यात आल्या आहेत. याप्रकरणी राजकीय नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत असतानाच आता एमआयएमचे खासदार इम्तिआज जलील यांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्यावेळी जाळपोळ झाली, त्यावेळी पोलीस आणि अग्निशमन दल का नाही पोहोचले? असा सवाल इम्तिआज जलील यांनी उपस्थित केला. (Sambhaji Nagar riots Why police fire brigade came late Imtiaz Jaleel question to the government)

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्तिआज जलील यांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “एकमेकांवर आरोप करण्याची ही वेळ नाही, असे आवाहन मी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना करतो आहे. सध्या आपल्याला आपले शहर कसे शांत ठेवता येईल, याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. जे झाले ते दुर्देव असून, या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे मी स्पष्ट सांगितले. उच्चस्तरीय कमिटी स्थापन करून याप्रकरणाटचा चौकशी करणे गरजेचे आहे. यामागे कोणाचा हात आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतर पोलीस इतक्या उशीरा का आली? असे अनेक प्रश्न आहेत”, असे इम्तिआज जलील म्हणाले.

- Advertisement -

“मी राम मंदिरात तीन तास बसलेलो होते. त्यावेळी तिकडे एक एसीपी आणि एक पीआय होते. त्यावेळी मी त्यांना वारंवार याठिकाणी पोलीस दल दाखल का होत नाही? असा सवाल विचारला. त्यावेळी मला त्यांनी सांगितले की, ते आझाद चौकात उभे आहेत. पण येण्यास ते तयार नव्हते. ज्यावेळी गाड्या जाळत होते, त्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलाला फोन करून बोलावले. पण तेही आले नाही”, असे इम्तिआज जलील यांनी सांगितले.

दरम्यान, “संबंधित परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यची गरज आहे. तसेच, याप्रकरणाचा तपास करण्याची आहे. तसेच, एकमेकांवर आरोप करण्याची आता वेळ नाही”, असेही इम्तिआज जलील यांनी म्हटले. याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन शांततेचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

शहरातील किराडपुरा भागात (Kiradpura) दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे. यात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून आठ ते दहा गाड्या जाळण्यात आल्या आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन शांततेचे आवाहन केले आहे. ही घटना रात्री ११.३० ते १२ वाजता दरम्यान घडली. आणि त्यानंतर हिंसाचार उसळला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (Dr.Nikhil Gupta) यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – संभाजीनगर दंगलीप्रकरणी फडणवीसांचा विरोधकांवर रोख, म्हणाले चिथवणारी वक्तव्ये करून…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -