घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरवाडा-गढी हलत नसली, तरी..; संभाजी पाटील-निलंगेकरांची देशमुखांवर टीका

वाडा-गढी हलत नसली, तरी..; संभाजी पाटील-निलंगेकरांची देशमुखांवर टीका

Subscribe

विधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे मराठवाड्यातील दोन नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी देशमुख गढी हलत नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी वाडा-गढी हलत नसली, तरी त्यातली माणसे हलतात, असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्याच्या राजकारणामध्ये अनेक गड तसेच वाडे यांच्यातली माणसं हलून इतर पक्षात गेली आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अमित देशमुख केवळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी असा संभ्रम निर्माण करू नये. एक तर उंबरठा ओलांडून अलीकडे यावे अथवा जिथे आहे तिथेच राहावे, असा सल्ला संभाजी पाटील-निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते अमित देशमुख?

सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, महापालिका निवडणुका कधी होतील हे सुद्धा सांगता येत नाही. सध्या आपण अस्थिर परिस्थितीला तोंड देत आहोत. संजय काका पाटील भाजपात या म्हणत आहेत, पण तुम्हीच स्वगृही परतावे. तसेच लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली, कितीही वारे आले तरी तो तिथेच राहणार, असं स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा : पुढील तीन दिवसांत अविनाश भोसले रुग्णालयातून कारागृहात; कोर्टाने दिले आदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -