Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र संभाजीराजेंचेही भुजबळांच्या येवला मतदारसंघावर लक्ष, मेळाव्याच्या माध्यमातून मोर्चेबांधणी

संभाजीराजेंचेही भुजबळांच्या येवला मतदारसंघावर लक्ष, मेळाव्याच्या माध्यमातून मोर्चेबांधणी

Subscribe

नाशिक : स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे भोसले १० सप्टेंबर रोजी नाशिक दौरयावर येत असून त्यांच्या उपस्थितीत येवला तालुक्यात शेतकरी मेळावा तसेच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौरयाच्या पार्श्वभुमीवर येवला येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुकास्तरीय आढावा बैठक पक्षाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

छत्रपती संभाजीराजे हे गाव तिथे शाखा व घर तिथे स्वराज्याचा मावळा या अभियानांतर्गत स्वराज्य पक्षाचा विस्तार करण्यासाठी१० सप्टेंबरला येवला मतदारसंघाचा दौरा करणार आहे.या अनुषंगाने येवला मतदारसंघातील साधारणतः ३० गावांमध्ये स्वराज्यच्या शाखा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात तालुक्यातील पदाधिकार्‍यांना विविध जबाबदार्‍या निश्चित करून देण्यात आल्या. प्रत्येक गावामध्ये तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी जाऊन त्या ठिकाणचे नियोजन कसे करावे तसेच गावनिहाय शाखा सदस्यांचे फॉर्म भरून नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुक्या मध्ये सध्या असलेले महत्वाचे प्रश्न, यांसह वर्षानुवर्ष न सुटलेले प्रश्न या संदर्भातली सर्व माहिती येत्या दोन तारखेपर्यंत निर्धारित करावी.

- Advertisement -

त्याचबरोबर पक्षाच्या सभेचे ठिकाण या सगळ्या गोष्टींवर काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना वरिष्ठ पदाधिकार्‍यां मार्फत देण्यात आल्या. बैठकीला उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, नाशिक शहर व कसमादे विभाग जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे, जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ वैराळ, उत्तर महाराष्ट्र प्रमुख महिला आघाडी मनोरमाताई पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य पुष्पा जगताप, नाशिक महानगर प्रमुख महिला आघाडी निशिगंधा ताई पवार, आयटी विभाग वैभव दळवी, विष्णू पंत घुगे हे उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -