घरताज्या घडामोडीSambhaji Raje : 'स्वराज्य' नावाच्या संघटनेची स्थापना, संभीजाराजेंकडून दुसरी मोठी घोषणा

Sambhaji Raje : ‘स्वराज्य’ नावाच्या संघटनेची स्थापना, संभीजाराजेंकडून दुसरी मोठी घोषणा

Subscribe

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नवीर संघटनेची स्थापना केली असल्याची घोषणा केली आहे. या संघटनेचे नाव स्वराज्य असून मराठा समाजाला एक छताखाली आणण्यासाठी ही संघटना काम करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले आहे. तसेच लवकर महाराष्ट्र दौरा करणार असून या स्वराज्य संघटनेच्या चिन्हासाठी आणि रंगासाठी चर्चा करणार असल्याचे राजेंनी यावेळी सांगितले आहे. तसेच राज्यसभेवर जाण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे संभाजीराजेंनी जाहीरपणे स्पष्ट केलं आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली असल्याची घोषणा केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजेंनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. संभाजीराजे म्हणाले की, २००७ पासून शिव-शाहूंचा वंशज म्हणून काम करत आहे. संभाजी छत्रपतींनी नवीन पक्ष स्थापन करावं असे अनेकांचे मत आहे. वेगवेगळ्या संघटनांचे लोकं मला नेहमी पाठींबा देत आहेत. ही ताकद आहे छत्रपती घराण्याची. आपण राजकीय आवाज उठवयाचा का नाही? पण ती वेळ यावी लागते. चांगले आणि वाईट अनुभव मिळाले आहेत. जनतेला एका छताखाली कसं आणता येईल असा माझा प्रयत्न आहे आणि राहणार आहे.

- Advertisement -

ते म्हणजे या सगळ्यांना संघटीत करण्यासाठी , समाजाला वेगळी दिशा देण्यासाठी, अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी, गरीबांच्या कल्यणासाठी, महाराजांचे नाव देशभरात पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व एक संघटना स्थापित करणार आहोत. त्या संघटनेचे नाव स्वराज्य आहे. स्वराज्य या संघटना याचा प्रसार होण्यासाठी, स्वराज्य संघटित होण्यासाठी मी लगेच या महिन्यात ज्या प्रमाणे शिव-शाहूंचा दौरा केला होता. तसाच महाराष्ट्राचा दौरा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी आणि लोकांना संघटित करण्यासाठी स्वराज्य संघटना आज घोषित करु इच्छितो. ही संघटना स्थापन झाली असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले आहे. यामध्ये पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेणार आहे. ही संघटना, हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी वावगे ठरु नये. त्याला माझी तयारी असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले आहे.


हेही वाचा : राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -