क्रांती दिनी तुळजापूरला होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात, संभाजी राजेंचे ट्वीट

Sambhaji Raje reje

क्रांती दिनी तुळजापूरला होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात, असे ट्वीट संभाजी राजेंनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वराज्य नावाचा हॅश टॅग वापरला आहे. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिरात दर्शनावरून झालेल्या प्रकारानंतर संभाजी राजे पहिल्यांदाच तुळजापूरमध्ये जानार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले ट्वीट आणि घोषणा महत्वाची मानली जात आहे.

ट्वीटमध्ये काय? –

या ट्वीटमध्ये “क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात… भेटूया 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरला…” असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे, म्हंटले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी#स्वराज्य हा हॅश टॅग वापरला आहे.

संभाजीराजेंना मंदिरात प्रवेश नाकारल्याने झाला होता वाद –

संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात तुळजापूरमधून करण्याला कारण आहेत. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वाद निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला जात आहेत. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी क्रांती दिनी तुळजापूर इथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्वीट केल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

स्वराज्य संघटनेची घोषणा-

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी 12 मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगितले. सोबतच स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले होते. या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत, असेही संभाजीराजे म्हणाले होते. त्यामुळे संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.