घरमहाराष्ट्रमराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, १६ जूनला पहिला मोर्चा काढणार-...

मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, १६ जूनला पहिला मोर्चा काढणार- संभाजीराजे

Subscribe

१६ जूनला पहिला मोर्चा काढणार

राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील भूमिका शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावरून जाहीर करणार असे खासदार संभाजीराजे छत्रपती जाहीर केले होते. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे काय भूमिका जाहीर करणार याकडे साऱ्या मराठा समाजाचे लक्ष लागले होते. त्यामुळे आज राजगडावरून शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यानंतर संभाजीराजेंनी आपली ठोस भूमिका स्पष्ट केली आहे. आत्तापर्यंत मी संयम राखला, हो मी संयमी आहे. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाही, मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल, त्यामुळे मराठा आंदोलन हे निश्चित आहे. असे म्हणतं संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आपली ठोस भूमिका सरकारसमोर मांडली आहे. मराठा आरक्षणाच्या पहिल्या मोर्चाला छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरुवात होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मागण्या मान्य न झाल्यास १६ जूनपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी किल्ले रायगडावरुन केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमदार, खासदारांची

“आजपर्यंत तुम्ही संभाजी छत्रपतींना संयमी रुपात बघितले, हो मी संयमी आहे, पण आजपासून संयम बाजूला ठेवत मराठा समाजासाठी लढणार. लोकसभेत खासदार पगार घेतात आमदार विधानसभेत पगार घेतात, त्यामुळे आरक्षण मिळवून देणे त्यांची जबाबदारी आहे, परंतु कोणताही आमदार पुढे आलेले नाही. त्यामुळे तुमची जबाबदारी काय आहे स्पष्ट करा, सरकाराला आत्तापर्यंत हात जोडून विनंती केली परंतु काही फरक पडला नाही, त्यामुळे संयम बाजूला सारत मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल, म्हणून ठरल्याप्रमाणे मराठा आंदोलन होणार हे निश्चित आहे.” अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकाराला इशारा दिला,

- Advertisement -

मराठा समाजला गृहित धरु नका

“मला सांगायचंय की सध्या मराठा समाजाने रस्त्यावर उतरु नका, सरकारला समजावण्याची पहिली जबाबदाराही लोकप्रतिनिधींची आहे. यात मराठा समाजाचा पहिला मोर्चा शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणाहून निघणार आहे. परंतु लोकप्रतिनिधींनीही स्पष्ट करावे की ते सकल मराठा समाजाला कसा न्याय मिळवून देणार आहेत. तेव्हाच त्यांनी बोलायचं. कोरोना संपल्यानंतरही सरकारने ठोस पावलं उचलली नाहीत. त्यामुळे संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार आहे. परंतु या मोर्चादरम्यान पहिला लाठी मारायची असल्यास ती छत्रपतींच्या वंशजावर संभाजीराजेंवर मारावी लागेल. त्यामुळे मराठा समाजाला गृहित धरु नका” असेही संभाजीराजे म्हणाले.

“माझा लढा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. आपलेच पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मागच्या सरकारचे लोकं म्हणाले आत्ताच्या सरकारने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही,” असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यासाठी प्रयत्न

“पहिले स्वतंत्र्य आपल्याला कोणी मिळवून दिले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यामुळे आजचा शिवराज्याभिषेक सोहळा हा खरा स्वातंत्र्य दिन आहे. आज ३५० हून अधिक वर्षे कुठल्या राजाचं कौतुक केले जाते? शिवजयंती असो, शिवराज्याभिषेक सोहळा असो, छत्रपती शिवाजी महाराजांइतके जगात कोणत्याही राजाला नतमस्तक होताना पाहयला मिळणार नाही. हे शिवाजी महाराजांचे वैभव आहे. ही शिवाजी महाराजांची ताकद आहे. या घराण्यात माझा जन्म झाला हे माझे अडवांटेज आहे. परंतु आज माझ्यापेक्षा अधिक शिवभक्त शिवाजी महाराजांवर प्रेम करतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पण या दोन वर्षात कोरोना महामारीचे संकट वाढले आहे, त्यामुळे गेल्यावर्षी फक्त २५ जणांमध्ये हा सोहळा पार पडला. परंतु आता शिवभक्त माझ्यावर नाराज असतील, परंतु आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे जगतील, मी समादाला वेठीस धरु शकत नाही, लोकांची दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही, त्यामुळे शिवभक्त मला समजून घेतली, मी चुकलो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.” असेही संभाजीराजे म्हणाले.

महाराजांचे होन चलन देशभरात फिरवणार 

“शिवाजी महाराजांचे चलन म्हणून ओळखले जाणारे होन फक्त देशात दोन तीन ठिकाणीच पाहायला मिळते. एक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, दिल्ल्तील नॅशनल म्युझियम, तर काही खासगी लोकांकडे होन आहेत. पण आवकीरकर कुटुंबाचे कौतुक करावे लागेल, चार पाच पिढ्या त्यांचा देवघरात हे होन होते, हे होन राजेंपर्यंत कसे पोहचवयचे यासाठी प्रयत्न केले, पण त्यांनी हे होन माझा हातात असेच दिले नाही तर त्यांनी राजगडावरील संवर्धन, जतन करत रायगडाचे वैभव कसा वाढवता येईल या दृष्टीकोणातून त्यांनी माझे काम पाहिले. महारांजे सुवर्ण होन राज्यासह राज्याबाहेर लोकांपर्यंत कसा नेता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी पहिली सुरुवात कोल्हापूरातून करु, राजश्री शाहू महाराजांच्या समाधीजवळ लोकांना पाहण्यासाठी ठेवू. भवानी मंडप, शिवमंदिर, सिंधुदूर्गातील शिवाजी महाराजांचे पहिले मंदिरात ठेवू, नाशिकसह शिवाजी महाराजांचे जिथे जिथे योगदान आहे त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करु” असेही संभाजी राजे यांना सांगितले.


Sindhudurg Unlock : सिंधुदुर्गात सोमवारपासून कोरोनासंबंधीत नवे नियम होणार लागू


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -