घराण्यात फूट पाडण्याचा जुना इतिहास, संभाजीराजेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा

किल्ले रायगडावर सोमवारी ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी संभाजीराजे यांनी सोहळ्यासाठी उपस्थित असणार्‍या शिवभक्तांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करण्याचे टाळले, परंतु इतिहासाचे दाखले देताना त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टोलेबाजी करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Sambhaji Raje tweeted after Shahu Maharaj's reaction

स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुठेही तडजोड केली नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, परंतु तो तह त्यांनी धुडकावून लावला. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला होता, परंतु त्यांना अडवण्यासाठी बाप-लेकामध्ये भांडणे लावण्यात आली. शहाजीराजेंवर मोठा दबाव होता. घराण्यात फूट पाडण्यासाठी अनेक जण तेव्हा पुढे आले होते. घराण्यात फूट पाडण्याचा इतिहास जुना असल्याचे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

किल्ले रायगडावर सोमवारी ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी संभाजीराजे यांनी सोहळ्यासाठी उपस्थित असणार्‍या शिवभक्तांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करण्याचे टाळले, परंतु इतिहासाचे दाखले देताना त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टोलेबाजी करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने झाला. त्यावेळी मी रायगडावर येऊ नका, अशी हाक दिली होती. तो शब्द तुम्ही ऐकला.

मी किल्ल्याचे संवर्धन सुरू करीत राष्ट्रपतींनादेखील शिवाजी महाराजांसमोर आणले आहे, परंतु मला कोणी सांगितले की उद्या राजीनामा द्या, तर मी लगेच देईन. मला फरक पडत नाही. शिवाजी महाराजांनादेखील मुघलांच्या दरबारात अपमानित करण्यात आले होते. तेव्हा ते तिथून निघून गेले. आम्ही त्याच शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. आम्ही आमच्या स्वाभिमानाला जपतो.

तेव्हा अनेक शाह्या होत्या. घराण्यात फूट पाडण्यासाठी अनेक जण पुढे आले होते. महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला तेव्हा शहाजीराजेंना आदिलशहाने पत्र लिहून महाराजांना घरात थांबवा, नाहीतर आपल्यात सामील करून घ्या, असे सांगितले होते. शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांना स्वराज्य उभे करण्यासाठी मार्ग करून दिला. त्यांच्याच मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया उभारला, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

शिवसेनेने राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची चांगलीच कोंडी झाली होती. अखेर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.