घरताज्या घडामोडीगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे हे राज ठाकरेंचेही मत - संभाजीराजे छत्रपती

गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे हे राज ठाकरेंचेही मत – संभाजीराजे छत्रपती

Subscribe

महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन कसे करता येईल यादृष्टिकोनातून चर्चा

मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सगळ्या पक्षांच्या प्रमुखांची भेट घेऊन चर्चा करत आहे. सकाळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तर शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही भेटणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाजी राजेंनी भेट घेतली आहे. या भेटीमध्ये मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी चर्चा करण्यात आली. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे हे राज ठाकरेंचे मत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.

मराठा समाज हा प्रमुख समाज आहे महाराष्ट्राचा आणि त्यांना न्याय मिळावा सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे आरक्षण रद्द केले आहे. याच्यापुढे मार्ग काय काढायचा याची जबाबदारी माझी नाही तर सगळ्या पक्षातील प्रमुखांची आहे म्हणून प्रयत्न सुरु आहे. हा कुठला भेटींचा सिलसिला सुरु नाही आहे. असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कामाची पद्धत वेगळी आहे. ते खऱ्या अर्थाने जात पात काही मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे ते आहेत. तसेच माझी जी भूमिका आहे त्याला राज ठाकरे पाठिंबा देत आहेत. कारण राजर्षि छत्रपती शाहू महाराज म्हणजे माझे पंजोबा आणि राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधानकार ठाकरे हे दोघं जिवलग मित्र होते ते नातं आजही छत्रपती घराण्याचे आणि ठाकरे घराण्याचं आहे. त्यावरसुद्धा बरीच चर्चा झाली अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या विषयावर चर्चा झाली ती म्हणजे किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे, महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन कसे करता येईल यादृष्टिकोनातून चर्चा झाली असल्याची माहिती राजेंनी दिली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येणार आहे. तर दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

खासदार संभाजीराजेंची शरद पवारांना भेट

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये शरद पवारांना सांगितले की, मराठा समाज किती अस्वस्थ, दुःखी आहे. तसेच एकंदरीत त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगितली असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे यांसारख्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असेही राजेंनी शरद पवार यांना सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -