Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र संभाजीराजेंचा U Turn; गौतमी पाटीलला दिलेला पाठिंबा घेतला मागे, म्हणाले अशी 'कला'..

संभाजीराजेंचा U Turn; गौतमी पाटीलला दिलेला पाठिंबा घेतला मागे, म्हणाले अशी ‘कला’..

Subscribe

स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तिला पाठिंबा दिला होता मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांनी यू टर्न घेत हा पाठिंबा काढून घेतला आहे. 

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप नोंदवल्यानंतर राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटलं. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी गौतमी पाटील हिला पाठिंबा दिला. तर त्यात स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तिला पाठिंबा दिला होता मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांनी यू टर्न घेत हा पाठिंबा काढून घेतला आहे.  ( Sambhaji Raje Chhatrapati U Turn on Gautami Patil support Withdrawn the support given to Gautami Patil  )

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

महिलांनी आपले गुणे व कर्तृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोकसुद्धा पाटली आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मांडलं होतं.

संभाजीराजेंनी पाठिंबा घेतला मागे

- Advertisement -

संभाजीराजेंनी ट्वीट केलं असून या कलाकाराची कला मी बघितली. आता असं वाटतंय की महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा कले ला नको रे बाबा, संरक्षण असं म्हणत आपलं विधान मागे घेतलं आहे.

( हेही वाचा: गौतमी पाटीलच्या आडनावाला विरोध नाही म्हणत मराठा महासंघाने ठेवली ‘ही’ अट )

- Advertisement -

संभाजीराजेंचं ट्वीट काय?

काल एका पत्रकाराने एका महिलेचा “कलाकार” असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची कला मी पाहिली. आता असं वाटतं की, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा कलेला नको रे बाबा संरक्षम, असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

संभाजीराजे काय म्हणाले होते?

कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं म्हणत संभाजीराजे यांनी तिचं समर्थन केलं. महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व दाखवले, हे सांगत असताना संभाजीराजे यांनी इतिहासातील महाराणी ताराबाई यांचं उदाहरण दिलं. महाराणी ताराराणी यांनी 7 वर्षे औंरगजेबाशी लढा दिला, तेव्हापासून महिला सबलीकरण झालं आहे. शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं आहे. कलाकारांनी संरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे, असेही संभाजीराजे म्हणाले.

 

- Advertisment -