घरताज्या घडामोडीमराठा समाजाला वेठीस धरु नका, आरक्षणावर तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दौरा करणार -...

मराठा समाजाला वेठीस धरु नका, आरक्षणावर तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दौरा करणार – संभाजीराजे छत्रपती

Subscribe

राज्य सरकार व केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो याबाबत समजून घेण्यासाठी हा दौरा

मराठा आरक्षणावर खसादार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणावरुन मराठा समाजाला वेठीस धरु नका असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. तर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्याला संभाजीराजे यांनी छत्रपती शाहू समाधीस्थळाचं दर्शन घेऊन सुरुवात केली आहे. कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि तालीम संस्थांसोबत संभाजीराजे चर्चा करणारआ हेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील गायकवाड कमिशनचा अहवाल पुर्णपणे धूडकावून लावला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसा यांची २७ मे रोजी मुंबईत भेट घेणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर निर्णय देताना राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. गायकवाड कमिशनचा अहवाल रद्द केला आहे. यामुळे मराठा समाजाने पुढे काय करायचे, मार्ग काढायचा यासाठी महाराष्ट्र दौरा करुन मराठा समाजातील तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शाहू समाधीस्थळाचं दर्शन घेतले त्यांना अभिवादन केले. शाहू महाराजांनी जी दिशा देशाला आणि राज्याला दाखवली ती पुरोगामी चळवळीची आहे.

- Advertisement -

पुरोगामी चळवळच ही होती की, बहुजन समाजाला दिशा कशी दाखवता येईल, बहुजन समाजाला एकत्र कसे आणता येईल यासाठी शाहू महाराजांनी १९०२ ला ५० टक्के आरक्षण दिले होते यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाच्या समावेश आहे. परंतु मराठा समाजावर अन्याय झाला आहे.

मराठवाडा, खान्देश दौऱ्यानंतर २७ मे रोजी मुंबईत येणार आहे. या दौऱ्यामध्ये मराठा समाजातील तज्ज्ञ, विद्वान यांच्याशी चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन काढणे हा एक भाग आहे. परंतु यावर मार्ग काय काढता येतोय, राज्य सरकार व केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो याबाबत समजून घेण्यासाठी हा दौरा करत असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षण प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी २७ मे रोजी किंबहुना २८ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेत्यांना भेटणार आहे. सगळ्यांच्या भेटी घेतल्यानंतर मराठा समाजाची भूमिका मांडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता त्यांनी कधी भेटणार विचारले आहे. या भेटीमध्ये मराठा समाज कशाप्रकारे सरकारला मदत करेल याबाबत सांगू परंतु मराठा समाजाला वेठीस धरू नये किंवा मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये असा प्रयत्न आहे.

कोरोनाच्या संकटात जीव महत्त्वाचा

मराठा समाजावर अन्याय झाला आहे. परंतु कोरोनाच्या काळात लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. आपली तब्येत महत्त्वाची आहे. यामुळे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे जेणेकरुन समाजाला रस्त्यावर उतरायला लागणार नाही. मराठा समाजाच्या ५८ मोर्चांची जगाने दखल घेतली आहे. परंतु कितीवेळा लोकांना रस्त्यावर आणायचे. सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी काय मार्ग काढता येईल यावर विचार केला पाहिजे असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -