घरमहाराष्ट्रसंभाजीराजे छत्रपती छगन भुजबळांवर संतापले, मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची सरकारकडे मागणी

संभाजीराजे छत्रपती छगन भुजबळांवर संतापले, मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची सरकारकडे मागणी

Subscribe

छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यांवरून संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. जी भूमिका छगन भुजबळ यांची आहे, तीच भूमिका सरकारची सुद्धा आहे का? हे आधी स्पष्ट करावे. नाही तर भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे यांच्याकडून करण्यात आली आहे.

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, तसेच इतर काही मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्यावतीने जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव या महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. जरांगे पाटील यांनी माझ्या शेपटीवर पाय देऊ नये, अन्यथा… असा थेट इशाराच भुजबळांकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे आता ओबीसी विरुद्ध मराठे असा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यांवरून संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. जी भूमिका छगन भुजबळ यांची आहे, तीच भूमिका सरकारची सुद्धा आहे का? हे आधी स्पष्ट करावे. नाही तर भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे यांच्याकडून करण्यात आली आहे. (Sambhaji Raje Chhatrapati’s demand for dismissal of Chhagan Bhujbal from post of minister)

हेही वाचा – भुजबळ भावूक होऊन म्हणाले, ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC समाजावर संकट आलं नसतं’

- Advertisement -

छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबतची पोस्ट केली आहे. भुजबळ हे आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी. छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.” असे स्पष्टपणे संभाजीराजे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ या टीकेला नेमके काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ओबीसींच्या महाएल्गार सभेतून छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका करत म्हटले की, कोणाचे खाता कोणाचे खाता? असे म्हणतो, पण तुझे खातो काय रे? तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हे आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. जे हजारो वर्षे दबले-पिचलेले होते, त्यांना सर्वांसोबत आणण्यासाठीची समता प्रस्थापित करणारी व्यवस्था आहे, हे समजून घेतले पाहिजे, असेही यावेळी भुजबळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -