संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला, पण…, संजय राऊतांची प्रतिक्रिया

विशेष म्हणजे तत्पूर्वी संभाजीराजे छत्रपतींनीही यावर भाष्य केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचे ते सविस्तर ठरलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे त्याप्रमाणे ते करतील. मला असाही विश्वास आहे की, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असंही त्यांनी सांगितलं.

sanjay Raut's clear statement on Sambhaji Raje candidature for rajyasabha
कोणीही असो शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचे स्पष्ट वक्तव्य

मुंबईः कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीही चर्चा केलीय. उद्धव ठाकरे छत्रपतींचा सन्मान राखतील, असं संभाजीराजे म्हणाल्यानंतर आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. संभाजीराजेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनीही संभाजीराजेंचा पर्यायानं छत्रपती घराण्याचा मान राखू, असं म्हटलं आहे.

आम्ही नक्कीच छत्रपती घराण्याचा मान राखू, त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला. एवढंच मी सांगू शकतो, पण ते शिवसेनेचे उमेदवार असतील, दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील, अशी आमची भूमिका आहे, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय. विशेष म्हणजे तत्पूर्वी संभाजीराजे छत्रपतींनीही यावर भाष्य केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचे ते सविस्तर ठरलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे त्याप्रमाणे ते करतील. मला असाही विश्वास आहे की, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असंही त्यांनी सांगितलं.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेसाठी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली. दरम्यान, महाविकास आघाडी पुरस्कृत खासदार करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. परंतु राज्यसभेची जागा शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेत प्रवेश करावा, यानंतर राजेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येईल, अशी शिवसेनेची भूमिका होती. परंतु शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी सोमवारी नाकारली असून, त्यांनी कोल्हापूर गाठलं होते.

शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी नाकारली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना सोमवार दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी यावे शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश करावा, त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप खासदार संजय राऊत यांच्याकडे दिला होता. परंतु संभाजीराजेंनी या निरोपाकडे पाठ फिरवली आहे. यानंतर त्यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे.

कोल्हापूरचे संजय पवार शिवसेनेकडून उमेदवार?

संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारल्यामुळे आता दुसरा उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. गेली 25 ते 30 वर्ष त्यांनी शिवसेनेचे काम केले आहे.


हेही वाचाः मुश्रीफांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई तर अनिल परबांचे काऊंटडाऊन सुरु, सोमय्यांचा इशारा