महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय, संभाजीराजेंच्या भावनेवर चर्चांना उधाण

Sambhaji Raje sentiments I want to create self government in your eyes
महाराज... तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय, संभाजीराजेंच्या भावनेवर चर्चांना उधाण

संभाजीराजे छत्रपती राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार होण्याची इच्छा संभाजीराजेंनी व्यक्त केली होती. तर शिवसेनेकडूनही त्यांना ऑफर देण्यात आली होती. शिवसेना उमेदवार म्हणून राज्यसभेवर जाण्याची ऑफर शिवसेनेकडून होती परंतु राजेंनी नकार दिला आहे. यानंतर राजेंचा राज्यसभेवर प्रवास खडतर झाला आहे. संभाजीराजे माघार घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. परंतु त्यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. महाराज तुमच्या नजरेतील स्वराज्य मला घडवायचं असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची ऑफर नाकारली आहे. यानंतर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु संभाजीराजेंनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली आहे. महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी आशा आशयाची पोस्ट संभाजीराजे यांनी केली आहे.

संभाजीराजेंच्या जागी कोल्हापूरचे संजय पवार मैदानात

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केला असता तर त्यांना शिवसनेकेडून उमेदवारी देण्यात येणार होती. परंतु त्यांनी ऑफर नाकारली आहे. त्यामुळे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजप तिसरा उमेदवार देणार?

भाजपकडून दोन जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी १ उमेदवार देण्यात आला आहे. मतांच्या गणितानुसार भाजप तिसरा उमेदवार मैदानात आणू शकते. केंद्राने सांगितले तर तिसरा उमेदवार उभा करु आणि तो जिंकेल असा विश्वास असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : संभाजीराजेंकडे सूचक म्हणून 10 आमदारही नाहीत, उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की?