Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सकाळी देवाचे मंत्र बोलतो पण त्यांच्या डोक्यात संभाजीराजेंचे मंत्र येतायतं, संभाजीराजेंचा चंद्रकांत...

सकाळी देवाचे मंत्र बोलतो पण त्यांच्या डोक्यात संभाजीराजेंचे मंत्र येतायतं, संभाजीराजेंचा चंद्रकांत दादांना टोला

मला कोणी शिकवण्याची गरज नाही मला जर देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतील तर त्यावेळी बोलेल - सभाजीराजे छत्रपती

Related Story

- Advertisement -

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भुमिका घेतली आहे. संभाजीराजे यांनी मोर्चा, लाँग मार्च काढण्याची घोषणा केली आहे. परंतु संभाजीराजेंनी आपली भूमिका नीट स्पष्ट करावी असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच संभाजी राजे राष्ट्रपती नियुक्त खासदार असले तरी ते ऑनपेपर भाजपचे खासदार आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. सकाळी देवाचे मंत्री बोलतो पण त्यांच्या डोक्यात संभाजीराजेंच मंत्र येतायतं असे वक्तव्य संभाजीराजे यांनी केलं आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राजेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजेंनी चालढकल केल्यास मराठा समाजाचे नुकसान होईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावर राजेंनी प्रितिक्रिया दिली आहे की, मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज आहे. मी लोकांना वेठीस धरु शकत नाही. मराठा समाजासाठी २००७ पासून लढा देत आहे. हे कधी आलेत हेच माहित नाही त्यांनाच विचारावं, मला कोणी शिकवण्याची गरज नाही मला जर देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतील तर त्यावेळी बोलेल असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच संभाजीराजेंना तुमच्याबाबत चंद्रकांत पाटील का टीका करत आहेत असा प्रश्न केला यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला माहित आहे कालपासून संभाजीराजेच त्यांना दिसायला लागले आहेत. चांगली गोष्ट आहे. सकाळी आपण देवाचे मंत्र बोलतो पण त्यांना संभाजीराजेंचे मंत्र त्यांच्या डोक्यात यायला लागले आहेत. चंद्रकांत पाटील असे का म्हणत आहेत असं विचारले असता राजेंनी म्हटले त्यांना विचारा त्यांच्या ह्रदयात काय कारण आहेत. मला काय विचारता मी काय ज्योतिषी नाही आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी ज्योतिषी कधी मानलं नाही. अशा शैलित संभाजीराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकात पाटील काय म्हणाले

चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावरील भूमिकेवर बोट ठेवले आहे. संभाजीराजे लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची भाषा करत आहेत. परंतु लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारुन हा तिढा सुटणार आहे का? तसेच तुम्ही मराठा आरक्षणासाठी वाट बघणार आहेत की वाट लागण्याची वाट पाहणार आहेत. आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर मान्य होणार नाही असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच संभाजी राजे म्हणतात की, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. परंतु ऑन पेपर ते भाजप खासदार आहेत. असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


- Advertisement -

हेही वाचा : कोपर्डीतील पीडित कुटुंबियाला न्याय न मिळणं हे दुर्दैवी, संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट


 

- Advertisement -