घरमहाराष्ट्रसंभाजी राजे करणार नव्या इनिंगची सुरूवात, ट्विटमधून दिला सूचक संदेश

संभाजी राजे करणार नव्या इनिंगची सुरूवात, ट्विटमधून दिला सूचक संदेश

Subscribe

संभाजी राजे यांनी एक ट्विट केले असून या ट्विटमधून त्यांच्या राजकीय वाटचालीचे संकेत मिळत आहेत. त्यातही महाविकास आघाडीचे नेते संभाजी राजांच्या संपर्कात असल्याने ते काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संभाजी राजे छत्रपतींच्या राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत 3 मे रोजी संपली आहे. त्यानंतर त्यांनी नवी राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधान आले आहे. याबाबत संभाजी राजे यांनी एक ट्विट केले असून या ट्विटमधून त्यांच्या राजकीय वाटचालीचे संकेत मिळत आहेत. त्यातही महाविकास आघाडीचे नेते संभाजी राजांच्या संपर्कात असल्याने ते काँग्रेस किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सतेज पाटील यांचे आमंत्रण –

- Advertisement -

संभाजीराजे राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने अनेक दिग्गज नेते त्यांना पक्ष प्रवेशासाठी आग्रह करत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही संभाजी राजे यांना काँग्रेसमध्ये प्रवेशकरण्याचे आमंत्रण दिले आहे. ते म्हणाले, खासदार संभाजीराजे यांनी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. ते आपली भूमिका जाहीर करतीलच; पण ते आमच्या पक्षात आले तर ते आमचे भाग्यच असेल. यामुळे ते महाविकास आघाडीतील एका पक्षात जातील असा अंदाज वर्तवला जात आहे.

वडील छत्रपती शाहू महाराज यांचा चिमटा –

- Advertisement -

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाहू छत्रपती यांनी खासदार संभाजीराजे यांना आपण शाहूंचे कार्य देशात पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांच्या कार्याची महती अभ्यासपूर्ण मांडता आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे जरा लवकर कळले असते तर बरे झाले असते. उशिरा का होईना केंद्रातील नेत्यांना शाहू समजायला लागतील ही चांगली गोष्ट आहे, असे खोचक वक्तव्य करत चिमटा काढला होता.

मालोजीराजे पुन्हा सक्रिय –

संभाजी राजे यांचे धाकटे बंधु काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे हे कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत संक्रीय झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समिकरणे बदलणार आहेत. मालोजीराजेंनी आमदार जयश्री जाधव यांच्या विजयासाठी घेतलेला पुढाकार महत्वपुर्ण होता.

 

सूचक ट्विट –

छत्रपती संभाजीराजेंची राज्यसभा खासदारकीची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक फोटो ट्विट करत सूचक इशारा दिलेला आहे. या फोटो मध्ये संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक वाचताना दिसत आहेत. त्यांच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज, आजोबा मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज व वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज यांचे फोटो आहेत. या फोटो सोबत संभाजीराजे यांनी आजन्म विचारांशी बांधील असा संदेश दिला आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंचे ट्विट सूचक इशार देणारे असल्याचे बोलले जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -