मी सत्य तेच बोललो, वडिलांचा आदर करतो, संभाजीराजेंचे ट्विटमधून प्रत्युत्तर

Sambhaji Raje tweeted after Shahu Maharaj's reaction
महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो, संभाजीराजेंचे ट्विट

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर संभाजी राजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी शिवसेनेने छत्रपती घराण्याचा कोणताही अपमान केलेला नाही. हा संभाजी छत्रपतींच्या उमेदवारीचा प्रश्न असल्याचे म्हणत संभाजीराजेंचे कान टोचले होते. त्यानंतर संभाजी राजे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

काय म्हणाले शाहू महाराज –

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वबळावर पुढे जाने किंवा इतर पक्षांचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय त्यांच्याकडे होते. मागच्यावेळी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेताना ती घेऊ नये असे मत आम्ही मांडले होते. मात्र, त्यांनी तो निर्णय वैयक्तिक घेतला. त्यानंतर आतार्यंत त्यांनी जी राजकीय पाऊले उचलली त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी त्यांनी चर्चा केलेली नाही. यात छत्रपती घराणे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा आपमान आहे, असे म्हणता येणार नाही, असा खुलासा त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केला.

संजय पवार यांचे शिवसेनेकडून नाव जाहीर झाले आहे. शाहू महाराजांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संजय पवार यांच्यासाख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी देण्याचे काम केले आहे. तो पक्षासाठी अनेक वर्ष झटत होता. त्याचा आनंद आहे, असे मत शाहू महाराजांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेनेने दिलेला शब्द फिरवला असे म्हणता येत नाही असे म्हटले आहे.