घरताज्या घडामोडी"तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो", संभाजीराजेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा

“तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो”, संभाजीराजेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा

Subscribe

माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची तयारी आहे.

“दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचे नाही” असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र राज्य सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. पुण्यात संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला असून पुढील मूक मोर्चा हा नांदेड येथे होणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीवर तर्कवितर्क लढवणाऱ्यांवरही संभाजीराजेंनी निशाणा साधला आहे.

खासदार संभाजी राजे छत्रपती पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका समांजस्याची असल्याचे सांगितले आहे. मतभेद विसरुन केवळ मराठा समजाला एकत्र आलेल्यांबद्दल राजेंनी समाधान व्यक्त केलं आहे. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंड पाहत नव्हते ते आज एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचे आहे. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो मात्र आपल्याला ते करायचं नाही. आपण ही लढाई संयमानेच लढायची असल्याचे संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराज मॅनेज झाल्याच्या चर्चा

जुलै महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली होती. या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. महाराज मॅनेज झाल्या असल्याच्या चर्चा सुरु होत्या, या चर्चांवर संभाजीराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या दिवशी महाराज मॅनेज होतील त्या दिवशी घरी जाऊन बसेल, छत्रपती असे नाही मॅनेज होणार माझ्यावर विश्वास ठेवा असे सडेतोड उत्तर राजेंनी दिलं आहे.

आपल्या मागण्यांचे काय झालं

राज्य सरकारने समाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षणात काही करता येणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल कळतं अशा लोकांना सदस्य केले पाहिजे. माझी भूमिका मी मांडतो आहे. आरक्षण अनेक दिवस चालेल परंतू आपल्या मागण्यांचे काय झाले. मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक घेण्यात आली होती. आता त्या मागण्यांबाबत काय झाले. वसतिगृहांबाबत राज्य सरकारने जीआर काढून दाखवावा अता दोन महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नांदेडमध्ये मूक मोर्चा काढणार

मराठा आरक्षणासाठी २ मूक आंदोलनं झाली. महापूर आल्यामुळे आम्ही थांबलो होतो. कोरोना परिस्थिती सुधारत आहे. आता मराठा आरक्षणासाठी एक आंदोलन करावे लागणार आणि ते आंदोलन नांदेडला करु असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. २० रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

लाक्षणिक उपोषण करण्याची तयारी

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकारकडून विलंब होत आहे. यामुळे संभाजीराजेंनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची तयारी आहे. तुम्ही ठरवा आणि सांगा असं संभाजीराजेंनी सभेतील मराठा समन्वयकांना म्हटल आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण करण्यास विलंब करत आहे. राज्य सरकार लवकरात लवकर निर्णय घ्यावेत अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -