तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर…, संभाजीराजेंचा मराठा आरक्षणावरुन इशारा

तुमचा राजा जिवंत राहिला पाहिजे असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. पंरतु संभाजीराजेंचा रोख कुणाकडे होता हे स्पष्ट झाले नाही.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आणि आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाचा दुसरा दिवस असून संभाजीराजेंनी राज्य कर्त्यांना इशारा दिला आहे. तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर हे योग्य नाही असे वक्तव्य संभाजीराजे यांनी केले आहे. परंतु त्यांचा रोख नक्की कुणाकडे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी संभाजीराजेंनी राज्यभरात मोर्चा काढण्याची हाक दिली होती तसेच लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा राजेंनी दिला होता. राज्य सरकारने दखल घेऊन लवकरच तोडगा काढण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती परंतु अद्याप मागण्या पूर्ण झाल्या नाहीत यामुळे राजेंनी उपोषण सुरु केलं आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण सुरु झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. संभाजीराजेंच्या उपोषणावरुन मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

संभाजीराजेंची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील खासदार आणि नेते मंडळी येत आहेत. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी राजेंची भेट घेऊन त्यांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्य सरकार आणि महाविकास आघाडीची भूमिका आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचा असल्याचे अनिल देसाई म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. फडणवीस माझे मित्र आहेत. समाजाचे आरक्षण काढल्यापासून काही राहिले नाही हा दीर्घकाळ लढा असल्याचे राजेंनी सांगितले आहे. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना माझ्यासमोर उद्रेक होणे बरोबर नाही. तुमचा राजा जिवंत राहिला पाहिजे असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. पंरतु राजेंचा रोख कुणाकडे होता हे स्पष्ट झाले नाही.


हेही वाचा : ”मराठीच्या रक्षणाचा आव केवढा आणता” हल्ली शिव्यांपुरतेच ते मराठीपण जपतात, आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा