Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रांना 'सी फोर्ट सर्किट टूरिझम' माध्यमातून जलदुर्गला जोडावेत- संभाजीराजे छत्रपती

पर्यटन क्षेत्रांना ‘सी फोर्ट सर्किट टूरिझम’ माध्यमातून जलदुर्गला जोडावेत- संभाजीराजे छत्रपती

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती आज राज्यासह देशात साजरी होत आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्य़ा उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजधानी मुंबई आणि स्वराज्याची राजधानी रायगड यांना ‘सी फोर्ट सर्किट टूरिझम’च्या माध्यमातून जोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. याविषयी बोलताना संभाजीराजे छत्रपती सांगितले, महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास जगभरात पोहचवायचा असेल तर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना रायगडाशी जोडलं गेलं पाहिजे. यासाठी सी फोर्ट सर्किट टूरिझम’ म्हणजे जलदुर्गाच्या माध्यमातून जोडायला हवं. मुंबईतून समुद्रामार्गे रायगडला निघताना खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरुड जंजीरा हे किल्ले येतात. तिथून काही किलोमीटरवर रायगड किल्ला येतो. त्यामुळे हे किल्ले एकमेकांना समुद्रामार्गे जोडले तर पर्यटक वाढतील, शिवरायांचा इतिहास जगभर पोहचेल. असे त्यांनी सांगितले.


तसेच “शाहू महाराजांनी पुण्यात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरा करायला सुरुवात केली. छत्रपती राजाराम महाराजांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकले. आता मला रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवरायांची सेवा करायला मिळतेय, असेही ते म्हणाले. तसेच दिल्लीत गेल्या तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणताही राजकीय हेतू न ठेवता मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.


हेही वाचा- नाना पटोले यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

- Advertisement -

 

- Advertisement -