घरताज्या घडामोडीSambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंची तब्येत बिघडली, औषध घेण्यास स्पष्ट नकार, राज्य सरकारकडून...

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंची तब्येत बिघडली, औषध घेण्यास स्पष्ट नकार, राज्य सरकारकडून चर्चेचे निमंत्रण

Subscribe

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाच्या मागण्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे. संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस सुरु आहे. संभाजीराजेंती तब्येत बिघडली आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. तसेच साखरेची पातळीत घट झाला आहे. राजेंनी औषध घेण्यास नकार दिला असल्यामुळे काळजी वाढली आहे. डॉक्टरांच्या टीमने तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी औषध देण्याचा प्रयत्न केला परंतु उपोषणावर ठाम असल्यामुळे राजेंनी स्पष्ट नकार दिला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांची डॉक्टरांच्या टीमने सकाळी आरोग्य तपासणी केली. राजेंचा रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असल्याने त्यांना तीव्र डोके दुखी होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. औषध घेण्याचा आणि तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. परंतु उपोषणावर ठाम आहेत. रक्तदाब कमी झाल्यामुळे राजेंच्या ह्रदयाचे ठोके वेगाने कमी होत आहेत. तसेच साखरेची पातळी वाढवण्यासाठी इंजेक्शन देण्याच सल्ला डॉक्टरांनी दिला परंतु राजेंनी त्यालासुद्धा स्पष्ट नकार दिला आहे. डॉक्टरांनी रविवारीच संभाजीराजेंना सलाइन लावण्याचा सल्ला दिला होता परंतु राजे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

- Advertisement -

मराठा समन्वयक आणि राज्य सरकारमध्ये वर्षावर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. यानंतर मराठा समन्वयक वर्षावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मराठा समन्वयक यांच्यामध्ये बैठक सुरु झाली आहे. मराठा आरक्षण आणि राजेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यात यावा यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु झाले आहे. संभाजीराजेंनी सांगितले आहे की, २२ मागण्या असून ६ मागण्या तातडीने मंजूर होऊ शकतात यामुळे त्या मंजूर कराव्यात अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. दरम्यान या बैठकीत तोडगा निघणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांच्या भेटीचा पुरावाच नाही, सुप्रिया सुळेंनी राज्यपालांचा दावा काढला खोडून

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -