घरताज्या घडामोडीचलो रायगड! राज्यसभा निवडणुकीतून माघारी परतलेले संभाजीराजे उद्या कोणती भूमिका जाहीर करणार?

चलो रायगड! राज्यसभा निवडणुकीतून माघारी परतलेले संभाजीराजे उद्या कोणती भूमिका जाहीर करणार?

Subscribe

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek ceremony) सोहळ्याचे आयोजन केले आहे.

राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतलेले संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Bhosale) यांनी चलो रागयडचा (Chalo Raigad) नारा दिला आहे. उद्या, ६ जून रोजी दुर्गराज रायगडवरून ते कोणती राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek ceremony) सोहळ्याचे आयोजन केले आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांना संबोधणार आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांची पुढील रणनिती काय असणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

संभाजीराजे (Sambhaji Bhosale) यांनी मराठा आंदोलनाचं (Protest for Maratha Reservation) नेतृत्व केलं होतं. या नेतृत्वामुळे त्यांना सामान्य नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी सरकारविरोधात कठोर भूमिका मांडली. केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरलं. त्यामुळे त्यांना मानणारा एक स्वतंत्र चाहता वर्ग तयार झाला आहे. मराठा आरक्षणांसंदर्भात त्यांच्याशी अनेक संस्थाही जोडल्या गेल्या आहेत.

राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती ११ जून २०१६ रोजी राज्यसभा खासदार झाले होते. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ ३ मे रोजी संपला. मात्र, मधल्या काळात मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचे भाजपसोबतचे संबंध ताणले गेले.

- Advertisement -


हेही वाचा छत्रपती संभाजीराजेंची कोंडी

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. यासाठी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. या काळात त्यांनी स्वराज्य संघटनेचीही स्थापना केली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीची शिल्लक राहणारी मतं संभाजीराजेंना देण्यात येतील, असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं. मात्र, ऐनवेळी शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवार देणार असल्याचे घोषित केल्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका बदलली.

दरम्यान, शिवसेनेने संभाजी भोसले यांना विधान परिषद उमेदवारीची ऑफर देऊ केली. मात्र, ही ऑफर संभाजी भोसले यांनी नाकारली. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवाराची घोषणा केल्याने राज्यसभेवर जाण्यासाठी संभाजीराजे यांना पाठबळ कमी पडले. त्यामुळे संभाजी भोसले यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचे ठरवले.

मी राज्यसभा लढवत नसलो तरी ही माघार नाही. हा माझा स्वाभीमान आहे. कुणापुढे झुकून मला राज्यसभेची खासदारकी नको, असं संभाजीराजे यांनी ठणकावून सांगितले.

राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंर संभाजीराजे यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली होती. त्यानुसार, ते महाराष्ट्रभर मावळ्यांची बांधणी करणार असून स्वराज्याच्या नावाखाली लोकांना एकत्र करणार आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -