वानखेडेंचे आणखी एक फर्जीवाडा केंद्र, नवाब मलिकांनी फोटो ट्विट करत पुन्हा उडवली खळबळ

Sameer Dawood Wankhede Nawab malik tweet sameer wankhede new Bogus center sadguru resto bar
वानखेडेंचे आणखी एक फर्जीवाडा केंद्र, नवाब मलिकांनी फोट ट्विट करत पुन्हा उडवली खळबळ

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक फोटो ट्विट केला आहे. समीर दाऊद वानखेडे यांचे आणखी एक बोगस केंद्र असे नवाब मलिक म्हणाले आहेत. एका हॉटेलचा फोटो टाकत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र या हॉटेलबाबतचे रहस्य काय आहे? याची माहिती अद्याप नवाब मलिक यांनी दिली नाही. नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांचा शाळेचा दाखला आणि इतर कागदपत्र कोर्टात सादर केल्यानंतर आता एका हॉटेलचा फोटो ट्विट केल्यामुळे आता नवीन कोणता आरोप करण्यात येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप केले आहेत. बोगस ड्रग्ज कारवाई, बोगस जातप्रमाणपत्र आणि पहिल्या पत्नीला धमकावले तसेच तिच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आले असे अनेक आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्राबाबत वानखेडेंची चौकशी सुरु आहे. तसेच त्यांची आर्यन खान खंडणी प्रकरणातही एनसीबी एसआयटी टीम चौकशी करत आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरुन मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक फोटो ट्विट करत म्हणाले आहेत की, “समीर दाऊद वानखेडे यांचे आणखी एक बोगस केंद्र” दरम्यान फोटो एका हॉटेलचा असून त्या हॉटेलचे नाव सद्गुरु रेस्टो बार असे आहे. समीर वानखेडे यांचा या हॉटेलशी काय संबंध आहे? याबबात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. नवाब मलिक या हॉटेलबाबत काही वेळात माहिती देणार आहेत.

वानखेडेंची पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांना धमकी

मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी समीर वानखेडे यांच्यावर पहिल्या पत्नीवरुन खळजनक आरोप केला आहे. पहिल्या बायकोसोबत घटस्फोट घेतला आहे. भांडणे, वाद झाल्यानंतर ती मुलगी समोर येईल आणि सर्व सत्य सांगेल. या भीतीपोटी एका ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून त्यांच्या एका भावाकडे ड्रग्ज ठेवण्यात आले. यानंतर राज्य सरकारच्या एजन्सीच्या माध्यमातून त्याला अटक करण्यात आले. आजही तो मुलगा तुरुंगात आहे. मुलाला खोट्या केसमध्ये अडकवल्यानंतर वानखेडे पहिल्या बायकोच्या कुटुंबाला धमकी देत होते की, जर माझ्याविरोधात बोललात तर संपूर्ण कुटुंबालाच खोट्या ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकेल अशी धमकी वानखेडे यांनी दिली असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. मात्र मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.


हेही वाचा : भाजपने १२ आमदारांची फाईल तुंबवून ठेवल्याप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा संप अडकवलाय, राऊतांचा खोचक निशाणा