Sameer Wankhede Birth Certificate: सुनावणीआधीच क्रांती रेडकरने शेअर केला वानखेडेंचा जन्मदाखला

sameer wankhede caste certificate issue sameer wankhedes problems-increased cast certificate will be scrutinized by the scrutiny committee
समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची SIT सह स्क्रूटनी कमिटीकडून होणार तपासणी

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी बोगस जातप्रमाणपत्र दाखवून शासकीय नोकरी मिळवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रावरुन नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. कोर्टात आज दुसऱ्यांदा सुनावणी होणार आहे. यापुर्वीच समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला शेअर केला आहे. समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांनी बुधवारी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले असून वानखेडेंचा शाळेचा दाखला आणि इतर काही कागदपत्र देण्यासाठी परवानगी मागितली आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला सोशल मीडियावर पोस्ट केला होता. परंतु क्रांती रेडकरने काही वेळानंतर ती पोस्ट डिलीट केली. वानखेडेंच्या दाखल्याची पोस्ट मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाली आहे. क्रांती रेडकरने पोस्ट केलेल्या जन्म दाखल्यावर मुंबई महानगरपालिकेचा शिक्का असून महापालिकेमार्फतच दाखला काढण्यात आला असून दाखल्यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे असे नमूद करण्यात आले आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे प्रमाणपत्र ट्विट करुन प्रसिद्ध केले होते. या प्रमाणपत्रात वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद क. वानखेडे असे आहे. तसेच त्यामध्ये मुस्लिम धर्माचा उल्लेख करण्यात आला आहे. वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपाला वानखेडेंच्या वडिलांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. परंतु क्रांती रेडकरने समीर वानखेडेंचा दाखला पोस्ट करुन नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.


हेही वाचा :झूठ बोले कौआ काटे, नवाब मलिकांचा भाजप नेते अनिल बोडेंवर ऑडिओ क्लिप शेअर करत निशाणा