Sameer Wankhede Birth Certificate: समीर वानखेडेंच्या जन्मदाखल्यासह इतर कागदपत्रे बनावट, नवाब मलिकांचा आरोप

nawab malik gave assurance no comments and post publish against sameer wankhede in court
वानखेडे कुटुंबीयांविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करणार नाही, नवाब मलिकांची कोर्टात हमी

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात कोर्टात कागदपत्रे सादर केली असून गुरुवारी न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये यावर सुनावणी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच वानखेडेंनी जुनी कागदपत्रे नष्ट करुन नवे प्रमाणपत्र बनवले आहे. मुंबई महानगरपालिकेत सगळी माहिती असून माझ्याकडे त्यांच्या शाळेचा दाखला, शाळेत दाखल होण्याचा फॉर्म असे अनेक कागदपत्र असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. समीर वानखेडे हे बनावट नोटा आणि कागदपत्रांमध्ये अव्वल आहेत. पंरतु त्यांची बोगसगिरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपून राहणार नाही असा इशारा मलिक यांनी दिला आहे. नवाब मलिक म्हणाले की, वानखेडेंनी जन्म झाल्यावर जे सर्टिफिकेट होते त्यात बोगसपणा करुन नवीन तयार केले आणि आता दाखवत आहेत. कितीही काही केले तरी बोगस सर्टिफिकेटच्या आधारावर नोकरी घेतली ती नोकरी निश्चित रुपाने जाणार आहे असे नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक पुढे म्हणाले की, समीर वानखेडे यांनी १९९३ मध्ये खऱ्या कागदपत्रांमध्ये खोडाखोड करुन नवीन दाखले काढले. यामध्ये त्यांनी जुने रिकॉर्ड देखील नष्ट केले पंरतु ते विसरले की महानगरपालिकेतील सर्व कागदपत्र स्कॅन करुन ठेवले आहेत. त्यामुळे ते अजूनही आहेत. कोणीही कम्प्यूटरमधून काढून घेऊ शकतात असे नवाब मलिक म्हणाले.

वानखेडेंच्या वडिलांनी एक करोड २५ लाखांचा दावा केला होता. यामध्ये सुनवाणी झाली. न्यायालयाने सांगितले की लोकप्रतिनिधी असताना सखोल चौकशी करायला पाहिजे होती. यानुसार महानगरपालिकेच्या दस्तऐवजांची माहिती घेतली. शाळेचा दाखला, अॅडमिशन फॉर्म उपलब्ध केले आहेत. ते न्यायाधीशांच्या समोर ठेवले आहेत. बुधवारी न्यायालयात सादर केले आहे. गुरुवारी दुपारी सुनावणी होणार आहे. निश्चित रुपाने जे पुरावे आहेत ते सादर करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. तसेच वानखेडेंच्या कुटुंबाने अंतरिम दिलासा मागितला आहे की, नवाब मलिकांच्या बोलण्यावर बंधणे घाला त्यावर आदेश येईल यानंतर मानहानीचा दावा ठोकला आहे त्यावर सुनावणी होणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.


हेही वाचा : सुनावणीआधीच क्रांती रेडकरने शेअर केला वानखेडेंचा जन्मदाखला