‘सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात तुम्हाला…’, करण सजनानींचा समीर वानखेडेंबाबत मोठा गौप्यस्फोट

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. नुकताच समीर वानखेडे यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुन्हा दाखल केला. वानखेडेंशी संबंधित 29 ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. त्यानंतर याप्रकरणी आता आणखी गोपनीय माहिती समोर आली आहे.

Sameer Wankhede sushant singh rajput karan sajnani
Sameer Wankhede sushant singh rajput karan sajnani

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. नुकताच समीर वानखेडे यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुन्हा दाखल केला. वानखेडेंशी संबंधित 29 ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. त्यानंतर याप्रकरणी आता आणखी गोपनीय माहिती समोर आली आहे. समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणात कटकारस्थान रचण्यासाठी आपल्याला आरोपी बनण्यास सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट करण सजनानी यांनी केला आहे. (Sameer Wankhede Case Karan Sajnani Appears Before NCB SIT Lauds Professionalism)

आर्यन खान अटकप्रकरणी समीर वानखेडे यांनी 25 कोटींची लाच मागितली, असा आरोप सीबीआयने केला आहे. 25 कोटींच्या लाचप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू असताना ड्रग्ज प्रकरणातील आरोपी करण सजनानी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात आरोपी बनल्यास तुला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढू’, असे आश्वासन समीर वानखेडे यांनी दिले होते, असाही दावा सजनानी यांनी केला. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमके काय म्हणाले करण सजनानी?

‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करण सजनानी सांगितले की, “एनसीबीचे अधिकारी आशिष रंजन आणि समीर वानखेडे यांनी सांगितले की, तुमच्यावर 200 किलो ड्रग्ज प्रकरणी कारवाई करतोय. पण 2 आठवड्यांनी तुम्हाला पुन्हा यावे लागेल व सुशांतसिंह प्रकरणात आरोपी व्हावे लागेल. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कट रचण्यासाठी समीर वानखेडे यांना 30 हून अधिक लोकांची गरज होती. त्यामुळे त्यांनी मला सांगितले होते की, तुम्ही आम्हाला मदत करा. याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढू. पण मी सुशांतसिंहला ओळखतही नव्हतो. मात्र ते असं का करत होते? मला माहीत नाही”.


हेही वाचा – पुण्याला जाण्यासाठी माळशेज घाटमार्गे जाताय? त्याआधी ही बातमी वाचा