घरमहाराष्ट्रSameer Wankhede : वानखेडे कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येताहेत, क्रांती रेडकरचा खुलासा

Sameer Wankhede : वानखेडे कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येताहेत, क्रांती रेडकरचा खुलासा

Subscribe

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुंगात आहे. मात्र या प्रकरणाला रोज नवनवे धक्कादायक वळण मिळताना दिसतेय. अशातच ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने या प्रकरणी कारवाई करणाऱ्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंविरोधातच वसूलीचे आरोप केले आहे. त्यामुळे समीर वानखेडेंना आता चौकशीसाठी दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात बोलवण्यात आले आहे. यानंतर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी क्रांतीने वानखेडे कुटुंबियांना जीवे मारण्याचा धमक्या येत असल्याचा खुलासा केला आहे. आम्हाला जाळून टाकेन, मारुन टाकेन, लटकवून टाकेन अशा धमक्या दिल्या जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे, असं क्रांती रेडकरने सांगितले आहे.

“मला आणि माझ्या परिवाराला आपल्याच राज्यात कोणीतरी त्रास देत आहे, हे वाईट आहे. मला माझ्या राज्यात सुरक्षित वाटायला हवं ना? मला अनेकांनी शिव्या दिल्या आहेत. ट्रोल केलं जात आहे, आम्हाला जाळून टाकेन, मारून टाकेन अशा धमक्याही येत आहेत”. असं क्रांती म्हणाली.

- Advertisement -

“समीर वानखेडेंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र आम्हाल संरक्षण दिल्याने सरकारचे आभारी आहोत. आमच्या कुटुंबियांना धमकी दिल्या जातायत. आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या कोणी पाहत असेल तरी भीती वाटते आता. बनावट सोशल मीडिया अकाउंटवरून आम्हाला धमक्या दिल्या जातायत. तुमची परेड करू, तुम्हाला जाळू अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून वेळ आल्यानंतर ते जाहीर करू, असंही सांगितले जात असल्याचे क्रांती यांनी सांगितले.

“नवाब मलिकांना शुभेच्छा देते. त्याचं कुटुंब सुखी-समाधानी राहावं.. समीर वानखेडे प्रमाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकांना त्रास होतोय. त्यामुळे काहींना त्यांचे स्वार्थ साध्य करता येत नाही. काहींची इच्छा आहे त्यांना पदावरून हटवले जावे. म्हणून अशाप्रकारे काम सुरु आहे. मात्र ते निश्चित यासर्व गोष्टीतून बाहेर पडतील. कारण सत्याचा विजय होतो.”

- Advertisement -

क्रांती रेडकर यांच्यासह समीर वानखेडे यांची बहिणी वकील जास्मिन वानखेडे यांनीही पत्रकार परिषदेत बोलताना जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. तसेच नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘पुरावे असतील तर कोर्टात जावं, ट्वीट करुन लोकांचा वेळ वाया का घालवता?’, असं म्हणत जास्मिन वानखेडे यांनी थेट आवाहन केलं आहे. तसेच मला, कुटुंबाला रोज धमकीचे, जीवे मारण्याचे फोन येताहेत, असंही जास्मिन वानखेडे यांनी सांगितले आहे.


IND vs PAK : पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजर करणाऱ्या काश्मिरींवर राग का? मेहबुबा मुफ्तींचा सवाल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -