घरताज्या घडामोडीड्रग्जमुळे नवाब मलिक कोट्यावधींचे मालक; वानखेडेंच्या वडिलांचा आरोप

ड्रग्जमुळे नवाब मलिक कोट्यावधींचे मालक; वानखेडेंच्या वडिलांचा आरोप

Subscribe

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर धर्मांतराबाबत लावल्या आरोपासंबंधित आज क्रांती रेडकर आणि त्यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या बांद्र्यातील निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. यादरम्यान वानखेडेंचे कुटुंबिय आणि रामदास आठवले यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन ज्ञानदेव वानखेडे यांनी अनेक कागदपत्र दाखवली. ‘मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे,’ असं म्हणत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी निशाणा साधला आणि आरोप केले.

‘मंत्री होताना संविधानाची शपथ घेतली जाते. यावेळेस मंत्री व्यक्तिगत बदनामी करणार नाहीत, अशी शपथ घेतात. मात्र नवाब मलिक संविधानाचा अपमान करत आहेत. आमच्याकडे जन्मल्यापासूनचे शाळेतल्या दाखल्यापर्यंतचे सर्व कागदपत्रे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नसून मी महार जातीतील आहे. १९७८ साली मी मुस्लिम महिलेसोबत लग्न केले होते आणि हे लग्न हिंदू पद्धतीने झाले होते. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी जय भीम वाला आहे. मी आंबेडकरवादी आहे, याचा मला अभिमान आहे. आमच्यावरील वैयक्तिक आरोप थांबवे. हा प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. मात्र तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना बदनाम करू नका. काय असेल तर तुम्ही कोर्टात जावा,’ असे ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

- Advertisement -

पुढे समीर वानखेडेंचे वडील म्हणाले की, ‘नवाब मलिक भंगारवाले असून ते मुंबईत कधी आले, गाव कोणते, जन्म कुठला, त्यांचं पहिलं नाव काय याचा शोध घ्यावा. मला मलिकांच्या नावात शंका वाटतेय. कारण एका भंगारवाल्याचे नाव नवाब कसे काय असू शकते. याची माहिती काढावी. तसेच १०० रुपयांपासून नट बोल्ट विकणारा माणसाकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी कशी काय? याची चौकशी सरकार आणि माध्यमांद्वारे करावी. जर आता माझ्या मुलासह कुटुंबियांच्या पाठीमागे लागलात तर मी तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकून तुमचीही घरची सर्व परिस्थिती समोर आणू शकतो. मलिकांनी जावई आणि मुलीकडे लक्ष देऊन संस्कार करावे. याच्या पुढे काहीही काढू नका.’

‘तसेच ड्रग्ज प्रकरणात जावई आहे, म्हणजे मलिकही असण्याची शक्यता आहे. १०० रुपये कमावणारा भंगारवाला इतक्या कोटींची प्रॉपर्टी ड्रग्जमुळेच कमवू शकतो, बाकी कशातून मिळवू शकत नाही. मलिकांनी ड्रग्ज विकून प्रॉपर्टी मिळवली असावी. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात मलिक सहभागी आहेत की नाही? याचा तपास झाला पाहिजे,’ असे ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – वानखेडे कुटुंबिय आंबेडकर अनुयायी आहेत, दलित अधिकाऱ्यांवर अन्याय होतोय, रामदास आठवलेंचा समीर वानखेडेंना पाठींबा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -