घरमहाराष्ट्रसमीर वानखेडे जन्माने मुस्लीम नाही! जातप्रमाणपत्र समितीकडून क्लीनचिट

समीर वानखेडे जन्माने मुस्लीम नाही! जातप्रमाणपत्र समितीकडून क्लीनचिट

Subscribe

कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेले एनसीबीचे ( नार्केटिक्स कंट्रोल ब्युरोचे एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मोठा दिलासा दिला आहे. समीर वानखेडे हे जन्माने हिंदुचं आहेत, त्यामुळे ते जन्माने मुस्लीम असल्याचे सिद्ध होत नाही असं जातप्रमाणपत्र समितीने समीर वानखेडेंना क्वीनचिट दिली आहे. राज्याचे माजी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा प्रमाण पत्र समितीकडे गेले होते. यानंतर अखेर समीर वानखेडेंच्या बाजूने निकाल लागला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे म्हणत तसे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे समितीने ही तक्रार फेटाळली आहे.

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नाहीत, त्यामुळे वानखेडेंच्या वडिलांनी हिंदु धर्माचा त्याग करुन मुस्लीम धर्माचा स्वीकार केल्याचे सिद्ध होत नाही, यावरून समीर वानखेडे हे हिंदु महार 37 अनुसुचित जातीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. यावरून समीर वानखेडेंविरोधातील आरोप सिद्ध होत नसल्याचे म्हणत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तक्रार फेटाळली आहे.

- Advertisement -

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणासह एनसीबीने तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर तपासाविषयी अनेक दोषारोप पत्र सादर केले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वानखेडेंनी बनावट जन्माचा दाखला सादर केल्याचा आरोप केला होता, यावेळी मलिक यांनी समीर वानखेडेंचा मुस्लीम असल्याचा दाखला प्रसारमाध्यमांसमोर मांडला. वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. बारकाईने पाहिल्यास त्यात बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मलिकांनी केला होता.

माजी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावच असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. याप्रकरणी समितीसमोरही याप्रकरणी अनेक तक्रारी आल्या. दरम्यान 2021 च्या ऑक्टोबरमध्ये समीर वानखेडे आणि टीमने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयालाही ड्र्ग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली. यानंतर नबाव मलिक यांनी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचार आणि खंडणीचा आरोप केला होता.

- Advertisement -

दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळताच समीर वानखेडे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सत्यमेव जयते असे त्यांनी म्हटले आहे.

 


संजय शिरसाटांचे नाराजी नाट्यावर स्पष्टीकरण, राग येणं स्वाभाविक, विषय तिथे संपला…


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -