घरताज्या घडामोडीदेश ड्रग्जमुक्त करण्याची किंमत तुरुंगवास असल्यास स्वागतच, वानखेडेंचं मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर

देश ड्रग्जमुक्त करण्याची किंमत तुरुंगवास असल्यास स्वागतच, वानखेडेंचं मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना तुरुंगवास निश्चित असल्याचा दावा केला आहे. ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंची कारवाई बनावट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देश ड्रग्ज मुक्त करण्याची किंमत जर तुरुंगवास असेल तर त्याचे स्वागत आहे. तसेच आपण दुबईला गेलो नव्हतो मालदिवमध्ये प्रशासनाची परवानगी घेऊनच गेलो होतो असे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. तसेच मंत्री नवाब मलिकांनी घाणेरडे आरोप केले असल्याची प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली.

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडे प्रत्युत्तरात म्हणाले की, नवाब मलिक यांनी मी दुबईला गेलो असल्याची खोटी माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्यात मुंबईतच होतो. खंडणीसाठी मालदिवमध्ये गेलो असल्याचे घाणेरडे आरोप माझ्यावर करण्यात आलेत. मालदिवमध्ये गेलो होतो परंतु माझ्या कुटुंबासोबत गेलो होतो. शासनाची परवानगी घेतल्यावरच मालदिवमध्ये गेलो. स्वतःच्या पैशानेच आपण हा प्रवास केला असे समीर वानखेडे यांनी सांगितले.

- Advertisement -

मंत्री नवाब मलिक यांनी माझ्यावर आरोप केले असून खंडणी, वसूली हे घाणेरडे शब्द वापरले आहेत. मला नोकरीवरुन काढून टाकणार, तुरुंगात टाकणार असे ते म्हणाले असून माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. नवाब मलिक मोठे मंत्री आहेत. मी छोटा सरकारी अधिकारी आहे. महाराष्ट्र, देश ड्रग्ज मुक्त करण्यासाठी तुरुंगवास असेल तर त्याचे स्वागत आहे.

मी मुंबईतच, विमानतळावरुन माहिती काढा

समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे की, मी दुबईत गेलो असल्याचा दावा केला आहे. परंतु मी मुंबईतच होतो. तुम्ही पासपोर्ट पाहू शकता, विमानतळावरील माहिती मागवू शकता. फक्त मालदिवमध्ये रितसर परवानगी काढल्यानंतर कुटुंबासोबत गेलो होतो. बहिणीसोबतचा दुबईचा फोटो दाखवण्यात आला परंतु मी मुंबईतच होतो असे समीर वानखेडे यांनी सांगितले.

- Advertisement -

मृत आईवर घाणेरडे आरोप

मंत्री नवाब मलिक मागील १५ दिवसांपासून माझ्या मृत आई, वडिल आणि बहिणीवर घाणेरडे आरोप करत आहे. महिलेवर घाणेरडे आरोप करत आहेत. मी माझं काम करतो आहे. असे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -