शाहरुखच्या विनवणीला समीर वानखेडेने दिले होते हे उत्तर; म्हणाले, काही मूर्ख लोकं…

shahrukh khan

 

मुंबईः क्रुझ ड्रग्स् प्रकरणातून मुलाच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरुख खान तत्कालीन narcotics control bureau (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं होतं. काही मूर्ख लोकं संपूर्ण वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असं उत्तर समीर वानखेडे यांनी शाहरुखला दिले होते.

प्रिय शाहरुख, ड्र्ग्ज् प्रकरणात ज्या नवीन गोष्टी समोर येत आहेत. त्याने मलाही त्रास होतो आहे. कोणालाही आनंद होत नाही. आर्यनला याप्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्याचा आमचा कोणताच हेतू नाही. कायद्यात काही तांत्रिक तरतुदी आहेत. तरी कोणीही कितीही प्रयत्न केला तरी कोणत्याही मुर्ख माणसाला आर्यनच्या केसची वाट लावू देणार नाही. माझं तुला एकच म्हणणं आहे की संयम ठेव. हे सर्व लवकरच संपणार आहे, असं शाहरुखच्या विनवणीला समीर वानखेडेने उत्तर दिलं होत.

मी मुलांकडे पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून बघतो. मुलांना नवीन आयुष्य जगण्याची व देशाची सेवा करण्याची संधी मिळावी, हा माझा हेतू आहे. पण काही लोकं त्यांचा काहीही संबंध नसताना माझ्या हेतूला अपमानित करत आहेत, असंही समीर वानखेडेने शाहरुखला सांगितलं होतं.

माझ्या मुलाला यातून बाहेर काढ. त्याला तुरुगांत पाठवू नकोस. त्याच्या करिअरला आता कुठे तरी सुरुवात होणार आहे. तो जेलमध्ये गेला तर सर्वच संपून जाईल. तूही एक चांगला बाप आहेस. मला खात्री आहे की तू माझ्या मुलाला एक संधी देशील. मी माझ्या मुलासाठी तुझ्याकडे भिक मागतो. कायद्याच्या चौकटीत जे काही शक्य आहे त्यासाठी आर्यनला मदत कर. त्याची काळजी घे. मी तुला भेटू ईच्छितो. तू कुठे आणि कधी भेटशील सांग. मला तुला मिठी मारायची आहे, असे मेसेज शाहरुखने आर्यनच्या अटकेनंतर समीर वानखेडेला केले होते. त्याला समीर वानखेडेने उत्तरही दिले होते.

शाहरुख सोबत झालेल्या संभाषणाचा तपशील समीर वानखेडेने यााचिकेत जोडला आहे. मी याप्रकरणात लाच घेतलेली नाही. माझ्या आणि शाहरुखच्या संभाषणात कुठेही पैशाचा उल्लेख झालेला नाही. त्यामुळेच आमच्यातील संभाषणाची प्रत मी याचिकेत जोडली आहे, असे समीर वानखेडेने स्पष्ट केले.