घरताज्या घडामोडीSameer Wankhede : बार परवानाबाबतची FIR रद्द करण्यासाठी वानखेडेंची कोर्टात धाव, मंगळवारी...

Sameer Wankhede : बार परवानाबाबतची FIR रद्द करण्यासाठी वानखेडेंची कोर्टात धाव, मंगळवारी सुनावणी

Subscribe

वय कमी असतानाही वानखेडेंनी करारनाम्यात आपले वय चुकीचे दाखवले आहे. या बारचा परवाना २ फेब्रुवारीला रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केले होते त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी चुकीची माहिती देऊन बार परवाना घेतला या आरोपाखाली कोपरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही एफआयआर रद्द करण्यासाठी वानखेडेंनी हायकोर्टात धाव घेतली असून अर्ज दाखल केला आहे. यावर हायकोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये वानखेडेंनी चुकीची माहिती देऊन बार परवाना घेऊन फसवणूक केली अशी तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नोंदवण्यात आली आहे.

मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांचे कमी वय असतानाही वयाची खोटी माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतला होता. उत्पादन शुल्क विभागाने याची दखल घेत तक्रार केली होती. ठाण्यातील कोपरी पोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडे यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. जात प्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप वानखेडेंविरोधात करण्यात आला आहे. मंगळवारी एफआयआर रद्द करण्याच्या मागणीवर सुनावणी होणार आहे. वानखेडेंना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे?

- Advertisement -

समीर वानखेडे यांच्या नावे नवी मुंबईतील वाशीमध्ये सद्गुरु वार आणि रेस्टॉरंट नावाचा बार आहे. या बारचा परवाना वानखेडेंच्या नावावर आहे. हा परवाना 1996-97 मध्ये घेण्यात आला आहे. यावेळी समीर वानखेडे यांचे वय 18 पेक्षा कमी होते. यामुळे वयाची चुकीची माहिती देऊन परवाना घेतला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. वय कमी असतानाही वानखेडेंनी करारनाम्यात आपले वय चुकीचे दाखवले आहे. या बारचा परवाना २ फेब्रुवारीला रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केले होते त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

- Advertisement -

हेही वाचा : समीर वानखेडेंना मोठा धक्का, फसवणुकीप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -