समीर वानखेडेंची वादग्रस्त कारकीर्द; SRK, ARYAN, जात प्रमाणपत्र, नवाब मलिकांचे आरोप…

 

मुंबईः सनदी अधिकारी समीर वानखेडे यांची कारकीर्द वादग्रस्तच राहिली आहे. अभिनेता शाहरुख खानला २०११ मध्ये समीर वानखेडे यांनी दीड लाखांचा दंड ठोठावला होता. त्यांनतर शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणीही समीर वानखेडे यांनी अटक केली होती. मात्र आर्यनकडे ड्रग्ज सापडलेच नव्हते, असा दावा केंद्रीय अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने दिला होता. त्यावेळी माजी मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. आर्यन प्रकरणामुळे समीर वानखेडे यांची अमंली पदार्थ प्रतिंबधक विभागातून बदली करण्यात आली.

 

आर्यनला क्लिन चिट

आर्यनच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा एनसीबीच्या हाती लागला नाही. आर्यनला क्लीन चित मिळाल्यानंतर एनसीबीने त्याला जाणीवपूर्वक गोवले होते, असा दावा एनसीबीच्या अंतर्गत अहवालात करण्यात आला. याप्रकरणी आर्यन खान तब्बल २८ दिवस कारागृहात होता.

मुंबई पोलिसांनीही तपास केला बंद

मुंबई पोलिसांनीही आर्यन खान विरोधातील तपास बंद केला. मुंबई पोलीसही या प्रकरणाची चौकशी करीत होते. मात्र, त्यांच्या तपासात कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणात कोणतेच पुरावे मिळाले नसल्याने एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.

नवाब मलिकांचे आरोप आणि जात प्रमाणपत्राचा वाद 

समीर वानखेडे हे जन्माने हिंदुचं आहेत, त्यामुळे ते जन्माने मुस्लीम असल्याचे सिद्ध होत नाही असे स्पष्ट करत जात प्रमाणपत्र समितीने समीर वानखेडेंना क्लि चिट दिली. माजी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा प्रमाण पत्र समितीकडे गेले होते. यानंतर अखेर समीर वानखेडेंच्या बाजूने निकाल लागला. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे म्हणत तसे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे समितीने ही तक्रार फेटाळली. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम नाहीत, त्यामुळे वानखेडेंच्या वडिलांनी हिंदु धर्माचा त्याग करुन मुस्लीम धर्माचा स्वीकार केल्याचे सिद्ध होत नाही, यावरून समीर वानखेडे हे हिंदु महार 37 अनुसुचित जातीचे असल्याचे सिद्ध झाले आहे, समितीने स्पष्ट केले.

वानखेडेंच्या सद्गुरु रेस्ट्रो बारचा परवाना रद्द 

नवी मुंबईतील वाशी परिसरात समीर वानखेडे यांच्या मालकीचा हा सद्गुरु रेस्ट्रो बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर १९९७ रोजी या बारसाठीचे लायसन देण्यात आले होते. मात्र हे लायसन 31 मार्च 2022 पर्यंतच वैध होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही समीर वानखेडेंवर टीका केली होती. परंतु ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या बारचे लायसन रद्द केले. समीर वानखेडेंच्या वयात तफावत आढळल्याने लायसन्स रद्द केल्याचे कारण देण्यात आले होते.

अभिनेता शाहरुख खानला ठोठावला होता दंड

जुलै २०११ मध्ये शाहरुख खान कुटुंबीयांसह सुट्ट्या घालवण्यासाठी लंडनला गेला होता. सुट्ट्या संपल्यानंतर तो मुंबईत परतला . त्यावेळी समीर वानखेडे एयरपोर्ट कस्टम डिपार्टमेंटच्या सर्विस डिपार्टमेंटचे प्रमुख होते. शाहरुख स्वत:सोबत २० बॅग्ज घेऊन आला होता. यामुळे वानखेडे आणि त्यांच्या टीमने शाहरुखची बराच वेळ चौकशी केली. त्यानंतर एक्स्ट्रा लगेज आणल्यामुळे शाहरुखकडून दीड लाखाचा दंड वसूल केला होता.