घरताज्या घडामोडीAryan Khan Case : मी नकारात्मक गोष्टी बघत नाही.., कठोर कारवाईचे निर्देश...

Aryan Khan Case : मी नकारात्मक गोष्टी बघत नाही.., कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर समीर वानखेडेंचं सूचक ट्विट

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Drugs Case) शुक्रवारी ड्रग्जप्रकरणी क्लीनचीट मिळाली आहे. एनबीसीने आर्यन खानला क्लीनचीट दिली आहे. मात्र, क्लीनचीट मिळाल्यानंतर आता एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारकडून त्यांच्यावर आता कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नोकरीवरही गदा येऊ शकते, याबाबत शंका व्यक्त केली जातेय. मात्र, कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतरही समीर वानखेडेंनी सूचक ट्विट करत मी नकारात्मक गोष्टी बघत नाही, असं म्हटलं आहे.

मी कधीही नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देत नाही. कारण जर तुम्ही या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत बसलात तर तुमची प्रगती होणार नाही. मी नेहमी कोणत्याही गोष्टीची सकारात्मक बाजू पाहातो. ज्यामुळे मी कायम पॉझिटिव्ह राहतो, असं समीर वानखेडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, केंद्र सरकार करणार समीर वानखेडेंवर कारवाई?

- Advertisement -

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने कोर्टात आर्यनबाबत चार्टशीट दाखल केली होती. मात्र, आर्यनबाबत कोणत्याही प्रकारचे पुरावे आणि आरोप पत्रात त्यांच्या नावाचा समावेश नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे एनसीबीने आर्यनला मोठा दिलासा देत त्याला क्लीनचीट दिली आहे. मात्र, तपास अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांची आता नोकरी जाणार का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

कॉर्डिलियासह समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे. नवीन मलिक यांचे आरोप हे खरे होते हे आज स्पष्ट झाले आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला कोठडीत डांबून ठेवले होते. आता एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नावही नाही. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबई आणि महाराष्ट्राचे नाव बदनाम करण्याचे काम केले आहे, असं अतुल लोंडे म्हणाले.


हेही वाचा : Aryan Khan Drugs Case : आर्यन खानच्या क्लीनचीटवर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -