घरताज्या घडामोडीसमीर वानखेडेंनी केली दोन लग्ने, धर्मही बदलला? नवाब मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरने...

समीर वानखेडेंनी केली दोन लग्ने, धर्मही बदलला? नवाब मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरने दिले उत्तर

Subscribe

आमचे लग्न देखील हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाले आहे. आम्ही दोघेही सर्व धर्मांचा आदर करतो असे म्हणत क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहेत. ME N MY HUSBAND SAMEER R BO

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबी झोनल डिरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहेत. अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोप प्रत्यारोप करत आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे दलित नसून ते मुस्लिम असल्याचा आरोप केला.मलिकांच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने उत्तर दिले आहे. क्रांतीने एक ट्विट करत त्यात समीर आणि तिच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट करत समीर हिंदू असल्याचे म्हटले आहे. आमचे लग्न देखील हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाले आहे. आम्ही दोघेही सर्व धर्मांचा आदर करतो असे म्हणत क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहेत.

- Advertisement -

नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर मुस्लिम असल्याचा आरोप केल्यानंतर क्रांती रेडकरने ट्विट करत या आरोपाचे खंडण केले आहे. क्रांतीने दोघांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, ‘मी आणि माझे पती आम्ही जन्मापासूनच हिंदू आहोत. आम्ही कधीच दुसरा धर्म स्वीकारलेला नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीर यांचे वडील हिंदू होते. त्यांनी माझ्या मुस्लिम सासू सोबत लग्न केले ज्या आता या जगात नाहीत. त्याचप्रमाणे समीर यांचा पहिला विवाह स्पेशल मॅरेज अँक्ट अंर्तगत झाला होता. २०१६ मध्ये त्यांना तलाक झाला. २०१७ लग्न हिंदू मॅरेज अँक्टनुसार आमचे लग्न झाले.’

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटची एक कॉपी ट्विट करत जातीचे खोटे सर्टिफिकेट तयार करुन सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये समीर वानखेडे यांच्या वडीलांचे नाव ‘दाऊद क. वानखेडे’ असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे धर्माच्या ठिकाणी ‘मुस्लिम’ असे देखील लिहिले आहे आणि हे बर्थ सर्टिफिकेट समीर वानखेडे यांचे असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -


नवबा मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी देखील हे आरोप खोटे असल्याचे म्हणत यासंबंधी एक प्रेस रिलीज जारी केले होते. ज्यात त्यांनी मी एका बहु धार्मिक परिवारातून असल्याचे म्हटले होते. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून ते हिंदू आहेत. माझी दिवगंत आई जहीदा मुस्लिम परिवारातून असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे समीर यांनी पुढे असे देखील म्हटले होते. की मी एक धर्म निरपेक्ष, भारतीय परंपरा मानणाऱ्या परिवारातून आहे.

समीर वानखेडे यांनी त्यांच्या पहिल्या बायकोसंदर्भातील एक प्रेस रिलीज देखील जारी केले होते. त्यात त्यांनी २००६ मध्ये मुस्लिम महिला डॉ.शबाना कुरैशी यांच्या लग्न केले परंतु २०१६मध्ये दोघांनी तलाक घेतला. त्यानंतर २०१७मध्ये क्रांती दिनानाथ रेडकर हिच्याशी लग्न केल्याचे म्हटले होते.


हेही वाचा – Aryan Khan Drugs Case: NCB ने झापल्यानंतर आजच्या चौकशीला अनन्या पांडेची दांडी, कारण आले समोर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -