Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम समीर वानखेडेंची पाच तास सीबीआय चौकशी; उद्या हायकोर्टात सुनावणी

समीर वानखेडेंची पाच तास सीबीआय चौकशी; उद्या हायकोर्टात सुनावणी

Subscribe

 

मुंबईः आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची रविवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाच तास चौकशी केली. चौकशी संपल्यानंतर समीर वानखेडे यांनी वंदे मातरम्, अशी प्रतिक्रिया दिली.  शनिवारीही समीर वानखेडे यांची सीबीआयने पाच तास चौकशी केली. उद्या, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

cruise drugs प्रकरणातून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडेंनी २५ कोटींची लाच मागितली असा आरोप करत CBI ने गुन्हा नोंदवला. तशी तक्रार NCB ने सीबीआयकडे केली होती. त्यानंतर समीर वानखेडेंच्या घरावरही छापा टाकण्यात आला. CBI ने चौकशीसाठी समीर वानखेडेंना समन्सही जारी केले. याविरोधात समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

दिल्लीत सीबीआयने नोंदवलेला गुन्हा रद्द करावा. या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करु नये. सीबीआय तपासाला स्थगिती द्यावी. मला अटक न करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी समीर वानखेडेने याचिकेत केली आहे. या याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, CBI, NCB व महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात या याचिकेवर सुट्टीकालीन न्या. शर्मिला देशमुख व न्या. आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात वरीष्ठ वकील मर्चंट यांनी वानखेडेची बाजू मांडली. या प्रकरणात समीर वानखेडेला जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे. त्याने कोणत्याही प्रकारची लाच मागितलेली नाही. वानखेडे नियमानुसारच काम करत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सीबीआयने नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी वरीष्ठ वकील मर्चंट यांनी केली.

या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यासाठी CBI ने एक आठवड्याची मुदत मागितली. न्यायालयाने वानखेडे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच तपासाला सहकार्य करा,असेही न्यायालयाने वानखेडे यांना सांगितले आहे.

त्यानुसार, शनिवारी आणि रविवारी सीबीआयने वानखेडे यांची चौकशी केली. उद्या, सोमवारी होणाऱ्या सुनावणीत सीबीआय काय प्रत्युत्तर सादर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisment -