घरताज्या घडामोडीसन्मानाने बोलवायचे म्हणजे नक्की कसे? संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना सवाल

सन्मानाने बोलवायचे म्हणजे नक्की कसे? संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना सवाल

Subscribe

हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या यापेक्षा सन्मानाने बोलवण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय?

मातोश्रीवरून सन्मानाने बोलावणे आले तर आम्ही जाऊ अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतली आहे. पण, सन्मानाने बोलवा म्हणजे नक्की कसे असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी विचारला आला आहे. (Samna Edit on rebel mla strategy)

हेही वाचा – खरंच संजय राऊत शिवसेना संपवायला निघालेत का ?

- Advertisement -

अग्रलेखात म्हटलं आहे की, मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ, आता दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? मातोश्रीची परंपरा आणि संस्कार असा आहे की तिथे सगळ्यांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच मातोश्रीचे वैभव आणि श्रीमंती आहे. अलीकडे तर पन्नास मोठे खोके भरतील इतक्या चपलांचा ढिगारा मिनिटागणिक मातोश्रीवर होत असतो. हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या यापेक्षा सन्मानाने बोलवण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय?

हेही वाचा – संजय राऊत आले की लोक टीव्हीच बंद करतात, भुमरेंची खोचक टीका

- Advertisement -

देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे प्रदर्शन नाही

गेल्या अडीच वर्षांत हिंदुत्त्वाशी शिवसेनेने किंवा नेत्यांनी तडजोड केल्याचे एकतरी उदाहरण दाखवावे. हिंदुत्त्व म्हणजे धर्मांधता किंवा दंगलींचा माहोल निर्माण करून तडजोड असे नसते बाबांनो. पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भारतीय जनता पक्षालाही नुपूर शर्मांपासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले. येथे भाजपने हिंदुत्त्व धोक्यात आल्याची आरोळी ठोकली नाही. राज्य हे अशाच समन्वयाने चालवायचे असते. तिकडे प. बंगालात सेक्युलर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच खासदार महुआ मोईत्रांवर कारवाई केली. का? तर महुआ यांनी कालीमातेवर एक टिप्पणी केल्याने हिंदूंच्या भावना भडकल्याची बोंब भाजपने मारली. ममतांनी श्रीमती मोईत्रांवर कारवाई केली. या कारवाईमुळेही काँग्रेसचा सेक्युलरवाद धोक्यात आला नाही. देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे प्रदर्शन नाही, असंही या अग्रलेखातच म्हटलं आहे.

हेही वाचा – …म्हणून भावना गवळी यांना चीफ व्हिप पदावरून हटवले, संजय राऊत यांनी केला खुलासा

मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात

अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार असताना राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम यांसारखे हिंदुत्वाचे विषय काही काळ गुंडाळून ठेवावे लागले होते. पण मोदींचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येताच राममंदिर, ३७० कलमाचे विषय मार्गी लागले. आपल्याला आपल्या मतांपर्माणे राज्य चालवायचे असेल व निर्णय अमलात आाणायचे असतील तर स्वतःचे बहुमताचे सरकार निवडून आणणे हाच एकमेव पर्याय ठरतो. स्वतःस बंडखोर म्हणवून घेणाऱ्या आमदारांना कधी या पर्यायाचा विचार केला आहे काय? चला साहेब, आता पुरे झाले. हे महाविकास आघाडीचे सरकार थांबवा. आपण बाहेर पडू व स्वबळावर हिंदुत्वाचे सरकार आणू. तोपर्यंत वाटल्यास विरोधी पक्षात बसू. अशी भूमिका या तथाकथित हिंदुत्ववादी बडखोर आमदारांनी घेतली असती तर त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांनी व्वा रे माझ्या मर्दांनो असे बोलून पाठच थोपटली असतील. उलट सत्तेतून फक्त सत्तेकडे हाच मार्ग त्यांनी निवडला. इकडे त्यांना महाविकास आघाडीचा जाच होता तरी आता या गटास भाजपच्या तालावरच नाचायचे आहे. बाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा डंख व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर-झुडुपातले राजकारण करणाऱ्यांना समजते. मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात व बाहेर चपलांचे ढिगारे वाढतच आहेत, या वैभवाशी कसा सामना करणार?असाही प्रश्न या अग्रलेखातून शिंदे गटातील बंडखोर आमदारांना विचारण्यात आला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -